JOIN US
मराठी बातम्या / Viral / मुलांना जन्म देण्यासाठी मिळतात पैसे; दूध, डायपरचाही खर्च देतं सरकार

मुलांना जन्म देण्यासाठी मिळतात पैसे; दूध, डायपरचाही खर्च देतं सरकार

प्रत्येक देशात एक वेगळी समस्या असते आणि त्या समस्येसोबत लढण्यासाठी ज्याची त्याची वेगळी आयडिया आणि प्लॅनिंग.

जाहिरात

व्हायरल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जानेवारी : प्रत्येक देशात एक वेगळी समस्या असते आणि त्या समस्येसोबत लढण्यासाठी ज्याची त्याची वेगळी आयडिया आणि प्लॅनिंग. आपल्या देशात वाढती लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे आणि ती नियंत्रित करण्यासाठी सरकार विविध जनजागृती मोहिमा राबवते. त्याचबरोबर काही देश असे आहेत की जिथे लोकसंख्या कमी आहे आणि तिथे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळी धोरणे राबवली गेली आहेत. प्रत्येक देशाच्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार नियम आणि कायदे बदलले जातात. एक असाही देश आहे जिथे मुलांच्या जन्मानंतर पैसे दिले जातात. युरोपमधील बेलारूसमध्ये मुलांना जन्म दिल्यावर पैसै मिळतात. मुंबईत राहणारा ट्रॅव्हल ब्लॉगर मिथिलेश याने याविषयी माहिती दिली.मिथिलेशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, बाळाच्या जन्मानंतर त्याला बेलारूस सरकारने 1 लाख 28 हजार रुपये दिले आहेत. तो बेलारूसमध्ये त्याच्या पत्नीसह राहतो, त्यामुळे त्याला हे पैसे देण्यात आले आहेत. ही रक्कम सरकारकडून नवीन पालकांना दिली जाते. यानंतर, पुढील 3 वर्षांसाठी, त्यांना सरकारकडून दरमहा 18,000 रुपये दिले जातील. हे पैसे थेट पालकांच्या खात्यात जमा केले जातात. त्याची पत्नी लिसा यांनी 2 महिन्यांपूर्वी नॉर्मल प्रसूतीद्वारे बाळाला जन्म दिला.

बेलारुसमध्ये मुलांच्या संगोपनात त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारकडून ही रक्कम नवीन पालकांना दिली जाते. मुलांच्या जन्मावर खूप खर्च होतो, अशा परिस्थितीत आधी ही रक्कम लाखात असते आणि नंतर दर महिन्याला दूध-डायपर आणि अशा मूलभूत गोष्टींसाठी 18 हजार रुपये दिले जातात. मिथिलेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही पहायला मिळत आहेत.

दरम्यान, फिनलंडमध्ये 2013 मध्ये लेस्टिजार्वी नगरपालिकेत बेबी बोनसही सुरू करण्यात आला होता, त्याअंतर्गत बाळाचा जन्म होताच त्याला सुमारे 7 लाख 86 हजार रुपये देण्यात आले होते. या देशांमध्ये, लोकांना अशा बोनसद्वारे लोकसंख्या वाढविण्यास प्रोत्साहित केले जाते कारण जमिनीच्या तुलनेत लोकसंख्या फारच कमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या