JOIN US
मराठी बातम्या / Viral / नोकरावर जडलं मालकीणीचं प्रेम; एकमेकांना म्हणू लागले सलमान अन् कतरिना, भन्नाट लव्हस्टोरीचा video व्हायरल

नोकरावर जडलं मालकीणीचं प्रेम; एकमेकांना म्हणू लागले सलमान अन् कतरिना, भन्नाट लव्हस्टोरीचा video व्हायरल

पाकिस्तानमधला एक नोकर व त्याच्या मालकिणीची प्रेमकथासध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जुलै:  माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी सध्या सोशल मीडिया एक उत्तम व्यासपीठ आहे. जगभरातल्या असंख्य गोष्टी दर दिवशी या माध्यमातून वाचायला व पाहायला मिळतात. पाकिस्तानमधला एक नोकर व त्याच्या मालकिणीची प्रेमकथा (Love Story) सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नाझिया नावाच्या महिलेने तिच्या नोकरासोबत नुकताच विवाह केला. विशेष म्हणजे या महिलेने एका यू-ट्यूब चॅनेलला मुलाखत देऊन ही बाब स्पष्ट केली. एका रिपोर्टनुसार, नाझिया ही महिला पाकिस्तानमधली इस्लामाबादची रहिवासी आहे. मुलाखत देत असताना ती म्हणाली, की कुटुंबात कोणीच नसल्याने सोबत एक विश्वासू व्यक्ती असावी म्हणून पूर्वीपासूनच नोकराचा शोध सुरू होता. त्याच वेळी काही मित्रमंडळींनी सुफियान नावाच्या नोकराला कामावर ठेवण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्याची नियुक्ती केली गेली. त्याला प्रति महिना 18 हजार रुपये पगार देण्याचं निश्चित झालं. सुफियान यांचं अनेकांनी खूप कौतुक केलं होतं. त्यांचा स्वभावही खूप चांगला असल्याचं नाझियाने सांगितलं. सोबत काही दिवस राहिल्यानंतर नाझियाला सुफियानची काम करण्याची पद्धत फारच आवडली. कालांतराने प्रेम वृद्धिंगत होत गेलं. काही दिवस नाझियाने प्रेम व्यक्त न करता लपवून ठेवलं. परंतु एके दिवशी तिने सुफियानकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली. क्षणभर सुफियानचा यावर विश्वासच बसत नव्हता. परंतु, नंतर मात्र त्यांनीही नाझिया यांच्यावर प्रेम व्यक्त केले. त्यानंतर दोघांचा विवाह झाला.

हेही वाचा - 15 दिवसांत प्रेम, 16 व्या दिवशी लग्न अन् 20 दिवसातच उतरली प्रेमाशी नशा, सासू थेट तुरुंगात

 सुफियान नेहमी काळजी घेत असल्याचं नाझियाने सांगितलं. सुफियान प्रेमाने नाझियाला कतरिना कैफ असं म्हणतात, तर नाझिया सुफियानला सलमान खान या नावाने हाक मारते. विवाहाचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना खूप विरोध झाला. परंतु, दोघं एकमेकांसोबत भक्कमपणे राहिल्याने त्यांचे प्रेम सार्थकी लागलं.

सोशल मीडियावर प्रेमाच्या असंख्य कथा व्हायरल होत असतात. परंतु, नाझिया आणि सुफियान यांची अनोखी प्रेमकथा अनेकांना भावली आहे. नाझियाच्या मते, सुफियान तिच्यासाठी उत्तम स्वयंपाक तर करतोच. परंतु ती आजारी पडल्यानंतर खूप काळजीही घेतो. सूफियानच्या चांगल्या विचारसरणीमुळे आपण त्याच्यावर भाळल्याचं नाझियाचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तर यू-ट्यूब मुलाखतीत नाझियाने सुफियानसाठी ‘तेरा साथ है कितना प्यारा, कम लगता है जीवन सारा’ हे बॉलिवूडचं गाणंही गायले. एकमेकांवरचा प्रचंड विश्वास आणि प्रेम यामुळे आमचं नातं अतूट असल्याचं नाझिया आणि सूफियान यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या