JOIN US
मराठी बातम्या / Viral / HIGHWAY वर शहामृगानं लावली रेस, गंमत पाहून आवरेना हसू; पाहा VIDEO

HIGHWAY वर शहामृगानं लावली रेस, गंमत पाहून आवरेना हसू; पाहा VIDEO

गर्दीच्या वेळी रस्त्यावर अचानक अवतरलेला (Ostrich run on the road in heavy traffic video goes viral) शहामृग पक्षी पळताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लाहौर, 27 ऑक्टोबर : गर्दीच्या वेळी रस्त्यावर अचानक अवतरलेला (Ostrich run on the road in heavy traffic video goes viral) शहामृग पक्षी पळताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सगळेजण कामावर जाण्याच्या (Ostrich in hurry) गडबडीत असताना स्वतःलाही गडबड असल्याप्रमाणे हे शहामृग दिसत होतं. जगातील सर्वात मोठा (World’s biggest bird) पक्षी मानला जाणारा एक शहामृग रस्त्यावर असा काही डौलदार धावत होता, की पाहणारे पाहतच राहिले.

संबंधित बातम्या

गमतीदार पण गंभीर पाकिस्तानमधील लाहौरच्या रस्त्यांवर धावणारा शहामृग पाहून त्यावेळी प्रवास करणाऱ्यांनी आपल्या गाड्यांचा वेग काहीसा कमी करत तो नजारा डोळे भरून पाहून घेतला. अनेकांनी आपापले मोबाईल खिशातून बाहेर काढले आणि धावणाऱ्या शहामृगाचं चित्रिकऱण केलं. इतर वाहनांच्या जोडीनं रस्त्याने धावणारा शहामृग पाहून अनेकांना हसू आवरत नव्हतं. मात्र त्याचवेळी अशा प्रकारे शहामृग रस्त्यावर येणं, ही गंभीर बाबदेखील मानली जात आहे. वाहनांच्या गर्दीत शहामृगाला अपघात होऊ शकला असता किंवा त्याला काही दुखापतही होण्याची शक्यता होती. त्यावेळी आजूबाजूच्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत शहामृगापासून काही अंतर राखून गाड्या चालवल्यामुळे दुर्घटना टळली. मात्र तरी हा शहामृग रस्त्यावर आलाच कसा, अशी चर्चा रंगली होती. काहींना वाटलं की प्राणी संग्रहालयातून सुटून तो इकडे आला असावा, तर काहीजणांनी हा शहामृग पाळीव असावा, असा अंदाज बांधला. हे वाचा- जिराफच ठरला TIGER! सहा वाघांनी चढवला हल्ला, तरीही तुकवली नाही मान व्हिडिओ होतोय व्हायरल पाकिस्तानमधील रस्त्यांवरून धावणाऱ्या शहामृगाचा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला अनेक मजेशीर प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत. या शहामृगाला जणू ऑफिसला पोहोचण्याची घाईच झालीय की काय, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर दुसऱ्याने त्याला उद्देशून, उस्ताद, कहां जा रहे हो? असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी अशा प्रकारे शहामृग रस्त्यावर आल्याबद्दल चिंतादेखील व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या