मुंबई : माणसांसारखंच प्राणी आणि पक्षांनाही आपलं हक्काचं घर हवं असतं. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वृक्षतोडीमुळे पक्षी बेघर होऊ लागले आहेत. एक संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक क्षण तुम्ही नि:शब्द व्हाल आणि डोळ्यात पाणी येईल. बेजबाबदारपणाची परिसीमा ओलांडणारा हा व्हिडीओ आहे. माणसाच्या बेजबाबदारपणामुळे काही शे पक्षांचा बळी गेला आहे. निष्पाप पक्षांना लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तिरुरंगडी या शहरातून हा व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग-66 च्या विकासासाठी झाडे तोडली जात होती. एक झाड असं होतं ज्यावर पक्षांची खूप घरटी होती.
हे झाड बुलडोजरने पाडण्यात आलं. काही पक्षी उडून गेले मात्र जे पक्षी उडू शकत नव्हते किंवा जी पिल्लं होती, काही पक्षी अंडी देणारे होते. काही पक्ष्यांची अंडीही त्या घरट्यात होती अशा एक नाही अनेक वेगवेगळ्या पक्षांची एक प्रकारे हत्यात करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. त्यानंतर विचार न करता चिंचेचे मोठे झाड तोडल्यामुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत ‘पक्ष्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर कंत्राटदारांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला असं वनविभागानं म्हटलं आहे. अनेक लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.