लाखो रुपयांना या जीन्सचा लिलाव.
वॉशिंग्टन, 13 ऑक्टोबर : तशा तुम्ही बऱ्याच ब्रँडेड, महागड्या आणि डिझाइनर जीन्स घालत असाल. त्यामुळे तुम्हाला जीन्सची किंमतही माहिती असेल. त्यामुळे फोटोतील ही घाणेरडी जीन्स आणि त्याचा लाखो रुपये किमतीचा आकडा पाहूनच तुम्हाला धक्का बसला असेल. फक्त फोटो पाहूनच कुणी फुकट दिली तरी ही जीन्स नको, असं तुम्ही म्हणाल. पण हीच जीन्स लाखो रुपये देऊन खरेदी करण्यात आली आहे. आता असं या जीन्समध्ये काय खास आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. घाणेरडी, मळलेली, मातीचे डाग असलेली, वापरलेली, ओल्ड फॅशन अशी ही जीन्स. पण हीच जीन्स लाखो रुपयांना विकली गेली आहे. या जीन्सची किंमत 62 लाख रुपये आहे. हा आकडा ऐकूनच तुम्हाला धक्का बसला ना? न्यू मेक्सिकोमध्ये या जीन्स पँटच्या एका जोडीचा लिलाव झाला. 76,000 डॉलर्स म्हणजे तब्बल 62 लाख 60 हजार 728 रुपयांना जिन्सची एक जोडी खरेदी केली गेली. ही जीन्स पँट लेव्हिस कंपनीची आहे. हे वाचा - अगदी परफेक्ट जीन्स तुम्हाला मिळणारच! कधीही खरेदी करताना या टिप्स ध्यानात ठेवा लेव्हिसच्या या जीन्सच्या लिलावाची माहिती वॉल स्ट्रिट जर्नलच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार 1 ऑक्टोबरला झालेल्या या पँटच्या लिलावत डिओगोच्या एका विंजेट क्लोथिंग डिलर कायले हॉपेर्टने विटेंज क्लोथिंग कंपनी डेनिम डॉक्टर्सचे मालक ज़िप स्वीवनसनसोबत मिळून ही जीन्स खरेदी केली. खरेदीनंतर तोसुद्धा हैराण झाला आहे.
कायनने या लिलावाची 90 टक्के रक्कम दिली आहे. या फिल्डमध्ये अनुभवी असलेला स्टिव्हसन या पँट्ससाठी ग्राहक शोधतीलच असा त्याला विश्वास आहे. कायलेने आपलं दुकान गोल्डन स्टे व्हिंजेटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरही या पँटच्या लिलावाबाबत पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी या पँट्सबाबत माहिती दिली आहे. हे वाचा - कपड्यांशिवायच रॅम्पवर आली जगप्रसिद्ध Model Bella Hadid, शरीरावर Spray ने साकारला ड्रेस; पाहा Live video या जीन्सच्या ब्रँडसह ही जीन्स तयार करण्यात आली ते वर्ष खास आहे. ही पँट 1880 सालातील आहे. हो बरोबर वाचलंत. आमच्या लिहिण्यात चूक झाली नाही. 1980 नाही तर 1880 च.
डेनीम मॅगझीन लाँग जॉनने या लिलावाबाबत सर्वात आधी माहिती दिली होती. त्यानुसार ही अँटिक जीन्स काही वर्षांपूर्वी एका जुन्या खाणीत सापडली होती. खाणीत काम करणाऱ्या एका मजुराकडे ही जीन्स सापडली. यात वेस्टबँड्सवर सस्पेंडर बटण आहे आणि मागे एक खिसा आहे.