मुंबई, 04 एप्रिल : मोबाईलमार्फत होणारी फसवणूक तुम्हाला माहिती असेल. एखाद्या मोबाईल नंबरवरून आपल्या फोन किंवा मेसेज येतो आणि त्यावर रिप्लाय देताच आपली वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तीकडे जाते आणि आपण आर्थिक फसवणुकीला बळी पडतो. पण कधी कोणत्या मोबाईल नंबरमुळे मृत्यू ओढावल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? (Mobile number cause death) सध्या असेच भयानक मोबाईल नंबर चर्चेत आले आहेत (Haunted Mobile Number). तुम्ही हंडेट ठिकाण, हंडेट घर, एखादी हंडेट वस्तू याबाबत ऐकलं असेल पण कधी कोणत्या हंडेट मोबाईल नंबर्सबाबत एकलं आहे का? अशा हंटेड मोबाईलचे काही किस्से असल्याचा दावा केला जातो आहे. हे असे मोबाईल नंबर आहेत, ज्यावर फोन केल्यानंतर रिंग वाजताच तुमच्या आयुष्यात अडचणींच्या घंटा वाजायला लागतात. ज्यांनी या मोबाईल नंबर फोन केला त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - ‘या’ ठिकाणाहून फोन खरेदी कराल तर गाठाल तुरुंग,जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण? हे मोबाईल नंबर कोणकोणते आहेत ते पाहुयात. 0904444444 जपानी लोकांमध्ये धार्मिक प्रवृत्ती जास्त असते. एका मोबाईल नंबरला हे लोक खूप घाबरतात. हा मोबाईल नंबर आहे 0904444444. हा नंबर भयावह आहे, या नंबरशी राक्षसी ताकद जोडलेली आहे, असं या लोकांचं मानणं आहे. हा नंबर डायल केल्यानंतर भीतीदायक आवाज ऐकायला येतात आणि जो हा नंबर डायल करतो, त्याचा आठवड्याभरातच मृत्यू होतो असा दावा काही लोकांनी केला आहे. यासंबंधी पुरावे मात्र कुणाकडे नाहीत. 0888888888 बुल्गेरियातील 0888888888 हा व्हीआयपी नंबर. ज्या ज्या व्यक्तीने हा नंबर वापरला, तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो आहे. 10 वर्षे हे सुरू होतं. अखेर तिथल्या संबंधित प्रशासनाने हा नंबर बंद केला. 12074042604 हा नंबर 2013 साली एका हॉरर फिल्ममध्ये दाखवण्यात आला होता. हा नंबर ज्यांनी डाएय केला, त्यांना काही दिवसांनी भूत दिसू लागले, असा दावा केला जातो. हे वाचा - ‘या’ ठिकाणाहून फोन खरेदी कराल तर गाठाल तुरुंग,जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण? अनुभवांवर आधारित करण्यात आलेल्या दाव्यांबाबत एशियानेट न्यूज ने माहिती दिली आहे. या दाव्यात किती तथ्य आहे हे माहिती नाही. न्यूज 18 लोकमतही याची पुष्टी करत नाही. पण तरी सावध राहण्यास काय हरकत आहे.