प्रतिकात्मक फोटो
मुंबई 9 ऑक्टोबर : बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला आपल्या अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्या रहस्यमयी असतात किंवा त्याच्या असण्यामागचं कारण समोर येत नाही. खरंतर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचं उत्तर शास्त्रज्ञांना अद्याप मिळालेलं नाही. जसं की हे जर कोण चालवतं, ते कसं चालतं. अजून एखादी पृथ्वी आवकाशात असावी का? अशा अनेक गोष्टींची उत्तरे अजूनही अनुत्तरीत आहे. अशाच काही घटना खऱ्या आयुष्यात घडल्या आहेत, परंतू विज्ञान युगात या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण आहे. असे काही विचित्र लोक समोर आले आहेत, ज्यांची ओळख आजपर्यंत पटलेली नाही, ते कोण होते आणि ते कुठून आले. हे देखील कळू शकलेलं नाही. चला तर मग या रहस्यमय व्यक्ती आणि जगातील घटनांबद्दल जाणून घेऊ.
Mysterious Photo
1. जगातील सर्वात मोठी भीती लोकांसाठी हा मृत्यू आहे. परंतू एका असा मुलीचा मृतदेह सापडला होता, की जणू ती हसत होती. हे घडणे खरोखरच दुर्मिळ आहे. मरतान एखादी व्यक्ती कशी हसू शकते? याचं उत्तर शास्त्रज्ञांना सापडलेलं नाही. तसेच या मुलीची ओळख ही पटली नाही.
हे ही वाचा : हा Video थरकाप उडावणारा! कोणत्याही सेफटी शिवाय 23व्या मजल्याच्या छतावरुन Stunt करु लागला व्यक्ती
Mysterious Photo
2. अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्याच्या वेळी एका व्यक्तीच्या चित्राची खूप चर्चा झाली होती. चित्रात हा माणूस डोक्यावर उलटा पडताना दिसत आहे, जे खूप विचित्र आहे. सहसा असे कोणी पडत नाही. बऱ्याचदा लोक पायाच्या दिशेनेच खाली पडतात, म्हणजेच त्यांचे पाय खालच्या दिशेने पडतात, परंतू हा व्यक्ती काही विचित्र पद्धतीने काली पडला, असं का घडलं? याचं उत्तर उद्याप कोणालाही सापडेलं नाही.
Mysterious Photo
3. दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर झालेल्या हल्ल्याने सारे जग हादरले होते. पण अणुबॉम्बचा स्फोटही या सावलीला हादरू शकला नाही अशी एक सावली. या हल्ल्यात 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणाहून सुमारे एक किलोमीटर अंतरावरून एक फोटो काढण्यात आला, ज्यामध्ये एका व्यक्तीची सावली बसलेली दिसत होती. परंतू त्याची आजपर्यंत ओळख पटलेली नाही.
Mysterious Photo
4. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येदरम्यान एक महिला कॅमेऱ्यात कैद झाली होती. जिच्या हातात पिस्तूल होते. राष्ट्रपतींच्या मृत्यूला ही महिला जबाबदार असल्याचं म्हटलं जातं, मात्र तिची ओळख पटलेली नाही किंवा ती महिला अद्याप मिळालेली नाही
हे ही वाचा : साबणाचा शोध लागला नव्हता तेव्हा, कसे साफ केले जायचे कपडे?
Mysterious Photo
5. जगातील महान फोटोग्राफर केविन कार्टर यांनी काढलेल्या फोटोत कुपोषित बालक दिसले. हे मूल जमिनीकडे झुकलं होतं. त्याच्या मागे एक गिधाड दिसते. मुल मरणार आहे हे गिधाडाला माहीत होते, ज्यामुळे तो त्याची वाट बघत बसला आहे असं दिसत आहे. हा फोटो देखील खरोखरंच एक रहस्यमयी फोटो आहे.