JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'होकार-नकार समजून घेण्यासाठी...' नेटफ्लिक्सवरील चित्रपटाचा वापर करून मुंबई पोलिसांची भन्नाट क्रिएटिव्हीटी

'होकार-नकार समजून घेण्यासाठी...' नेटफ्लिक्सवरील चित्रपटाचा वापर करून मुंबई पोलिसांची भन्नाट क्रिएटिव्हीटी

मुंबई पोलिसांनी गुरुवारी (29 डिसेंबर) एक मजेशीर पण प्रभावी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना ‘संमती’चं (Consent) महत्त्व शिकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

जाहिरात

नेटफ्लिक्स चित्रपट कला

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर : मुंबई पोलिसांची सोशल मीडिया टीम वेळोवेळी सामाजिक संदेश आणि सार्वजनिक सेवा घोषणांबाबत (पीएसए) पोस्ट करत असते. चित्रपटांमधील मीम्स आणि दृश्यांचा प्रभावी वापर करून नाविन्यपूर्ण मेसेज तयार करण्यासाठी मुंबई पोलीस प्रसिद्ध आहेत. कोविड-19, रस्ता सुरक्षा, सायबर गुन्हे, महिलांची सुरक्षा आणि अधिकारांसंबंधी जनजागृती करणं असो किंवा कोणता प्रसंग मुंबई पोलीस नेहमी काहीतरी नवीन फंडा वापरतात. मुंबई पोलिसांनी गुरुवारी (29 डिसेंबर) एक मजेशीर पण प्रभावी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना ‘संमती’चं (Consent) महत्त्व शिकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडण्यासाठी मुंबई पोलिसांनी नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सायकॉलॉजिकल ड्रामामधील एक छोटी क्लिप वापरली आहे. हेही वाचा - VIDEO : बाईकस्वाराचा श्वास रोखायला लावणारा स्टंट; क्षणात बाईक पोहोचवली डोंगरावर मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ‘कला’ चित्रपटातील नायिका तृप्ती दिमरी ‘घोडे पे सवार’ हे गाणं गाताना दिसत आहे. “कोई कैसे उन्हे ये समझाये, सजनिया के मन में अभी इन्कार है (ती अजून तयार नाही हे त्याला कसं सांगावं?),” असे या गाण्याचे बोल आहेत. अचानक हे गाणं थांबतं आणि स्क्रीनवर एक मजकूर दिसतो. ‘समोरच्या व्यक्तीची संमती आहे की नाही हे समजण्यासाठी ‘कला’ गरजेची नाही," असा हा मजकूर आहे. हिंदी आणि उर्दूमध्ये, कला या शब्दाचा अर्थ प्रतिभा असा होतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘समोरची व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी तयार आहे की नाही, हे समजून घेणं फार अवघड नाही’, हे सांगण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी मिमच्या माध्यमातून केला आहे. “समजून घेण्याची कला. इनकार ≠ इकरार.” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. “तुमच्या समोरची व्यक्ती ‘नाही’ म्हणत आहे हे समजण्यासाठी तुम्हाला ‘कलेची’ गरज नाही,” असा याचा मराठी अर्थ होतो. महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीनं मुंबई पोलिसांनी ही पोस्ट केली आहे. महिलांनी म्हटलेलं ‘नाही म्हणजे नाहीच असतं’ या संदेशावर भर देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ अल्पावधित लोकप्रिय झाला आहे. नऊ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एका दिवसात याला 52 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. इन्स्टाग्राम युजर्सनी या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे की, ‘प्रत्येक वेळी बार(क्रिएटिव्हीटी) वाढवत आहेत’. तर, आणखी एकजण म्हणाला आहे की, “हे भन्नाट आहे, गाण्याचा किती आश्चर्यकारक उपयोग केला आहे.’ एका व्यक्तीनं तर सोशल मीडिया टीमला आनंद होईल अशी कमेंट केली आहे. या व्यक्तीच्या मते, “मुंबई पोलिसांचे सोशल मीडिया व्यवस्थापक पगारवाढीस पात्र आहेत.” “अतिशय महत्त्वाचा संदेश सर्जनशीलपणे दिला आहे,” असं एकजण म्हणाला आहे. मुंबई पोलीस विभागाने सार्वजनिक सेवा संदेशांमध्ये चित्रपटांचा संदर्भ वापरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, मुंबई पोलीस विभागाने रस्ता सुरक्षेबद्दल प्रभावी संदेश देण्यासाठी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील रूपक वापरलं होतं. सुरक्षितपणे वाहन चालवणे हे सर्वात महत्वाचे अस्त्र आहे, असा संदेश देण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या