JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / वर्षभराच्या चिमुकल्याचा स्वॅग! नकली टॅटू आणि दागिने घालून आईने बनवलंय 'ठग'

वर्षभराच्या चिमुकल्याचा स्वॅग! नकली टॅटू आणि दागिने घालून आईने बनवलंय 'ठग'

Tattoo Baby : प्रत्येक आईला आपल्या बाळाचं कौतुक असतंच. आई बाळाला कौतुकानं दागिने, नवे कपडे घालत असते. पण शमेकिया मॉरिस (Shamekia Morris) नावाच्या आफ्रिकन-अमेरिकन आईने तिचा मुलगा वयाच्या 6 महिन्यांचा असल्यापासून त्याच्या शरीरावर टॅटू काढण्यास सुरुवात केली आणि आता तुम्हाला बाळाच्या मुलायम संपूर्ण शरीरावर सर्व डिझायनर टॅटू (Baby with Tattoo on Body) दिसतील. सोन्याची चेन आणि हँडबँडसह मुलाचा स्वॅग पाहून तो तुम्हाला एखाद्या स्टारपेक्षा कमी वाटणार नाही. मुलाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत, जे त्याच्या स्टाईलवर (Baby with Body Art) फिदा आहेत.

0106

मुलाची स्टाईल पाहून काहींना ती क्यूट वाटली. पण आई शमेकिया मॉरिसवर तिच्या मुलाचा 'ठग' मेकओव्हर केल्याबद्दल टीका करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. अशा प्रकारे, लोक लहान मुलाच्या शरीरावर टॅटू काढणं योग्य मानत नाहीत आणि शमेकियाला वाईट आई म्हणत आहेत.

जाहिरात
0206

ट्रेलिन (Treylin) असं या मुलाचं नाव असून तो 6 महिन्यांचा असताना शमेकिया मॉरिसने त्याच्या शरीरावर नकली टॅटू काढण्यास सुरुवात केली. व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेली शमेकिया ही मूळची अमेरिकेतील फ्लोरिडा येथील असून तिला मुलाला अशा विचित्र प्रकारे सजवणं आवडतं.

जाहिरात
0306

तिने ट्रेलिनचे हात, पाय, हात आणि पोटावर टॅटूही बनवले आहेत. ही बॉडी आर्ट नकली असली तरी, लोक त्याला योग्य मानत नाहीत आणि शमेकिया वाईट आई असल्याचं म्हणतात. शमेकियाने स्वतःच्या मुलाला गुंडासारखं केलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

जाहिरात
0406

लव्ह डोंट जज (Love Don’t Judge) नावाच्या शोमध्ये शमेकियानं सांगितलं की, लोकांच्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे ती निराश आणि दुःखी होते. कारण ती वाईट आई नाही. डेली स्टारच्या वृत्तानुसार, शमेकिया म्हणते की, टिकटॉकच्या 30 सेकंदांच्या व्हिडिओ कंटेंटवरून कोणालाही काही म्हणणं योग्य नाही. त्यांचं भविष्य काय आहे, हे सांगता येत नाही

जाहिरात
0506

शमेकिया या टिप्पण्या मनावर घेत नाही. ती म्हणते की, आम्हाला जसं जगायचं आहे तसं आम्ही जगतो. लोकांनी चांगल-वाईट म्हणू नये. तसंच, तिला तिच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचं आणि मुलाच्या अंगावरील तात्पुरत्या स्वरूपाच्या टॅटूंमध्ये त्यांना कोणतीही समस्या नसल्याचं शमेकिया सांगते.

जाहिरात
0606

ती सांगते की, पूर्वी घरच्यांनाही मुलाच्या अंगावर टॅटू काढणं आवडत नसे. पण आता जेव्हा-जेव्हा मुलगा बाहेर फिरायला जातो, तेव्हा त्याच्याकडे लक्ष वेधलं जातं आणि ते त्यांना आवडतं. Tiktok वर तिचे 3 लाख फॉलोअर्स आहेत आणि तिच्या मुलाचे टॅटू आणि लूक त्यांना खूप आवडतात. मात्र, त्यामुळे अनेकजण या मुलाला पाहतात आणि काही नकारात्मक आणि अनेक सकारात्मक कमेंट्सही शमेकियाला मिळतात. (सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@nuggetworld561)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या