JOIN US
मराठी बातम्या / Viral / 8 मुलांची आई देणार नवव्या मुलाला जन्म, लोकांनी दिला फुटबॉल टीम बनवण्याचा सल्ला

8 मुलांची आई देणार नवव्या मुलाला जन्म, लोकांनी दिला फुटबॉल टीम बनवण्याचा सल्ला

आतापर्यंत आठ बाळं झाली आणि नवव्या बाळाच्या स्वागताची तयारी या जोडप्यानं सुरू केली आहे. जाणून घेऊया, या उत्साही कपलविषयी.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 20 डिसेंबर: आतापर्यंत आठ मुलांची आई (Mother of 8 kids) झालेल्या एका तरुणीनं आता नवव्या मुलाच्या जन्माची (Pregnant for ninth time) तयारी सुरू केली आहे. मुलं हा (Babies) अनेकांच्या आवडीचा विषय असतो. आपल्या संसारात लहान मुल असावं आणि त्याला वाढवत वाढवत आयुष्य सुखानं संपावं, असं अनेकांना वाटत असतं. मुलं घरात असतील, तर घरातील वातावरण खेळकर राहतं आणि घरात सतत आनंदाचे अनुभव येत राहतात. मुल वाढताना पाहणं, हे आपलंच बालपण दुसऱ्यांदा अनुभवण्यासारखं असतं, असंही अनेकांना वाटतं. पण या हौसेपायी किती मुलं असावीत, हा प्रत्येकाला प्रश्न असतो. अमेरिकेतील एका जोडप्याला आतापर्यंत 8 मुलं झाली, तरी त्यांची हौस काही फिटत नसल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या

नवव्या मुलाची तयारी अमेरिकेतील डलास भागात राहणाऱ्या 29 वर्षांच्या यालेंसिया रोसारियोला आठ मुलं आहेत. तिचा 36 वर्षांचा पती मायकलला आपल्याला 10 ते 12 मुलं असावीत, अशी इच्छा आहे. त्याची इच्छा आपल्याला आवडली असल्याचा यालेंसिया सांगते. आपली जरी एवढं मुलं व्हावीत, अशी इच्छा नसली, तरी आपली त्याला काही हरकत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. आतापर्यंत या कुटुंबाला 8 मुलं आहेत आणि आश्चर्य म्हणजे यात एकही मुलगी नाही. सगळेच्या सगळे मुलगे आहेत. आता यालेंसिया आणखी एका बाळाला जन्म देणार असून नुकतीच त्यांनी गर्भजल परिक्षण केलं. अमेरिकेत गर्भजल परिक्षण कायदेशीर असून तो गुन्हा मानला जात नाही. या परिक्षणात नववं अपत्यदेखील मुलगाच असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या कुटुंबात आनंदाचं वातावरण असून सर्वांनी नव्या बाळाच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे.

एका बाळाचा मृत्यू वास्तविक, आपल्या चौथ्या बाळाचा काही दुर्दैवी कारणांनी मृत्यू झाला होता, असं यालेंसिया सांगते. मात्र आजही तो आमच्यातच राहत असल्याचं आम्ही मानतो. त्यामुळे त्याच्यासह आम्ही मुलांची संख्या मोजतो, असं ती सांगते. हे वाचा- कॅन्सरवरील उपचारांमुळे होतो सेक्स लाईफवर परिणाम? महिलेनं सांगितला वाईट अनुभव फुटबॉल टीम बनवण्याचा सल्ला लोकांनी या बाबीवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही एक फुटबॉल टीम तयार करायला हरकत नाही, असा मजेशीर सल्ला एकाने दिला आहे. तर आता मुलगी होईपर्यंत थांबू नका, असंही एकानं सुचवलं आहे. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर हे कुटूंब सध्या चांगलंच प्रसिद्ध झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या