JOIN US
मराठी बातम्या / Viral / मामी-भाच्यानंतर आता सासू-जावयाने बांधली लग्नगाठ; 10 महिन्यांपासून होते फरार, गावात आल्यानंतर खळबळ

मामी-भाच्यानंतर आता सासू-जावयाने बांधली लग्नगाठ; 10 महिन्यांपासून होते फरार, गावात आल्यानंतर खळबळ

एका 50 वर्षीय सासूने आपल्या 25 वर्षीय जावयासोबत प्रेम विवाह केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुजफ्फरनगर, 1 जुलै : मुजफ्फरनगरमधील एका गावात विचित्र प्रकार समोर आला आहे. ज्यात नात्याच्या मर्यादांचं उल्लंघन केलं आहे. येथे एका 50 वर्षीय सासूने आपल्या 25 वर्षीय जावयासोबत प्रेम विवाह केला आहे. पती आणि मुलीने विरोध केल्यानंतर घरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी मामाच्या घरी राहायला आलेल्या एका भाच्याने आपल्या मामीसोबत लग्न केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर आता सासू-जावयाने संसार थाटल्याचे वृत्त पाहून लोक हैराण झाले आहेत.  (mother in law and the son in law got married) काय आहे संपूर्ण प्रकरण? भौराकला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील महिलेने आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. मुलीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या जावयाच्या प्रेमात पडली. या प्रेम प्रकरणातून दोघेही दहा महिन्यांपूर्वी घरातून फरार झआले होते. मात्र ते फरार झाल्यानंतरही कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली नाही. सांगितलं जात आहे की, दहा महिन्यांनंतर दोघेही परतले आणि कोर्ट मॅरेज केल्याचा दावा केला. हे ही वाचा- लग्नाआधी सेक्स करण्याची धक्कादायक शिक्षा; तरुणीचा मृत्यू, प्रियकर गंभीर त्यांनी सांगितलं की, ते दोघेही पती-पत्नी आहेत. हे समोर आल्यानंतर महिलेचे पती व पुत्रीने यावर विरोध दर्शवला. यानंतर घरात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. आसपासच्या लोकांनी या घटनेची सूचना पोलिसांना दिली. सूचना मिळताच पोलीस दोघांना ठाण्यात घेऊन गेले. सासूने आपल्या अर्धा वयाच्या मुलासोबत लग्न केल्यामुळे यावर गावात जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे सर्व कुटुंबायांनी त्यांच्याशी संबंध तोडले आहे. गावकरी या नात्याचा विरोध करीत आहेत. काय म्हणतात अधिकारी पोलीस ठाण्याचे प्रमुख जितेंद्र तेवतिया यांनी सांगितलं की, त्यांना या लग्नाबाबत सूचना मिळाली होती. पोलिसांनी दोन्ही पक्षाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जेव्हा सासू-जावयाला एकमेकांपासून वेगळं राहण्यास नकार दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या