नवी दिल्ली 16 जानेवारी : वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. विशेषतः वाघ, सिंह, चित्ता यांसारख्या धोकादायक शिकारी प्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समोर येतात. कारण जेव्हा हे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडतात तेव्हा ते रिकाम्या हाती परतणं जवळपास अशक्य असतं. त्यामुळे या शिकारीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र, प्रत्येकच वेळी शिकार त्यांच्या तावडीत सापडेलच असं नाही. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं बघायला मिळतं. संतापलेल्या हत्तीचा रस्त्यावरच धिंगाणा; पाठलाग करत सोंडेनं उचलली कार अन्.., Shocking Video यात दिसतं, की एक वाघ शिकारीच्या प्रयत्नात झाडावर चढला, मात्र त्याच्या हाती काहीच लागलं नाही. काही शिकारी असे असतात, ज्यांना आपल्या ताकदीवर पूर्ण विश्वास असतो. यामुळे ते काहीही विचार न करता शिकार करण्यासाठी झेप घेतात. असंच काहीसं सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं. यातं दिसतं, की शिकारीच्या प्रयत्नात वाघ झाडावर चढला खरा, पण माकडाने त्याला अशी अद्दल घडवली की इथून पुढे शिकार करण्याआधी तो दहा वेळा विचार करेल.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक माकड आपल्या पिल्लासह झाडावर बसलं आहे आणि खाली बसलेल्या वाघाने त्याला आपली शिकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. वाघ माकडाला पकडण्यासाठी झाडावर चढतो, पण माकड सहजपणे आपली सुटका करून घेतं. माकड वाघाला भरपूर त्रास देतं. वाघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण माकड दुसऱ्या दिशेनं पळू लागतं.
यादरम्यान वाघाचा तोल जातो आणि तो फांदीवरुन घसरून थेट खाली कोसळतो. जमिनीवर पडताच त्याला दुखापतही होते. यासोबतच वाघाची पूर्ण मेहनतही वाया जाते. हा व्हिडिओ @weirdterrifying नावाच्या अकाऊंटवरुव ट्विटरवर शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 8 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.