लंडन, 28 फेब्रुवारी : हल्ली टॅटू म्हणजे फॅशन झाली आहे. बहुतेक जण आपल्या शरीराच्या विशिष्ट भागावर टॅटू काढून घेतात. एका तरुणीनेही आपल्या शरीरावर असाच टॅटू काढला पण टॅटू काढल्यानंतर आता तिच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. टॅटू पाहताच तिला रडू कोसळलं आणि आता उत्साहात टॅटू काढणारी ही तरुणी हा टॅटू आपल्या शरीरावरून कायमचा काढून टाकण्यासाठी धडपडत आहे (Mistake in chest tattoo). 18 वर्षांची जेनिफर मॅकगीने आपल्या छातीवर टॅटू काढला. पण टॅटू काढल्यानंतर तिला टॅटूमध्ये असं काही दिसलं की तिला पश्चाताप होतो आहे. जेनिफरच्या या टॅटूत एक चूक झाली आहे (Tattoo Blunder). ज्यामुळे तिला लाज वाटते आहे. तिला लवकरात लवकर हा टॅटू घालवायचा आहे. पण तिने परमनंट टॅटू काढून घेतला आहे, ज्यामुळे तो काढून टाकणं अशक्य आहे. हे वाचा - फक्त हिच्या शरीरावरील केसांसाठी उतावळे पुरुष; BODY HAIR विकूनच कमावते लाखो रुपये तिने आपल्या छातीवर दोन फुलपाखरांचे टॅटू काढण्याचं ठरवलं. त्यामध्ये तिने with pain comes strength अशी एक प्रेरणादायी ओळ लिहिली. हे कर्सिव्ह रायटिंगमध्ये होतं, त्यामुळे जेव्हा हा टॅटू काढला तेव्हा तो ठिक वाटला. पण जेव्हा तो टॅटू त्वचेवर पक्का झाला तेव्हा त्यात सर्वात मोठी चूक तिला दिसली. टॅटू आर्टिस्टने strength ची स्पेलिंग strenth लिहिली होती. जेनिफरच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. काहींनी तिला टॅटू काढताना नीट लक्ष द्यायला हवं होतं, तिच्या हलगर्जीपणामुळेच हा चुकीचा टॅटू झाला, असं म्हटलं आहे. जेनिफर आता पुढे काय करणार अशी विचारणा काही युझर्सनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तिने हा टॅटू हटवणार असल्याचं सांगितलं आहे.