JOIN US
मराठी बातम्या / Viral / गळ्यात पट्टा बांधून महिलेला आणलं फ्लाईटमध्ये, लोक झाले चकीत; पाहा VIDEO

गळ्यात पट्टा बांधून महिलेला आणलं फ्लाईटमध्ये, लोक झाले चकीत; पाहा VIDEO

विमानात बसलेल्या प्रवाशांनी जेव्हा पाहिलं की एक तरुण विमानात प्रवेश करत असून त्याने त्याच्या पत्नीच्या गळ्यात पट्टा घातला आहे, तेव्हा सर्वानाच आश्चर्य वाटलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 डिसेंबर: एका व्यक्तीनं एका महिलेला (woman) तिच्या गळ्यात पट्टा (Strip around neck) बांधून विमानात आणल्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. गळ्यात पट्टा बांधणं आणि त्याला पकडून प्राण्याला हव्या त्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रकार हा प्राण्यांच्या बाबतीत (Animals) घडतो. मात्र एका पुरुषानं महिलेला प्राण्याप्रमाणे तिच्या गळ्यात पट्टा बांधून ओढत आणल्याचं पाहून विमानातील सगळेच प्रवासी थक्क झाल्याचं दिसलं   विमानात आला प्रवासी कोरोना काळात मर्यादित प्रमाणात विमानसेवा सुरु आहे. कोरोनाबाबतचे सर्व नियम आणि निकष यांचं पालन करूनच विमानात प्रवेश दिला जातो. अशाच प्रकारे तोंडावर मास्क लावलेले प्रवासी विमानात बसल्याचं या व्हिडिओत दिसतं. काही प्रवासी आपापल्या जागांवर बसले आहेत, तर काही चालत आपल्या सीटपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. जे बसले आहेत, ते आपापल्या जागी सेटल होत आहेत. तेवढ्यात विमानात आलेला एक प्रवासी सर्वांचं लक्ष वेधून घेतो. त्या प्रवाशाच्या हातात एक पट्टा असतो आणि त्याचं दुसरं टोक त्याच्यासोबत असणाऱ्या महिलेच्या गळ्यात बांधलेलं असतं.   महिलेला आणलं ओढत एखाद्या कुत्र्याला किंवा पाळीव प्राण्याला ओढत आणावं, त्याप्रमाणं हा तरुण त्याच्यासोबत असणाऱ्या तरुणीला ओढत चालल्याचं या व्हिडिओत दिसतं. जसजसे लोक पुढं सरकतात, तसतसा हा तरुणदेखील पुढे सरकतो आणि महिलेला पट्ट्याने ओढत राहतो पट्ट्याचाी ओढ बसली की महिला हळूहळू पावलं टाकत पुढं सरकते, असं या व्हिडिओत दिसतं.   हे वाचा -

व्हिडिओ होतोय व्हायरल सध्या सोशल मीडियावर असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकर्षक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याप्रमाणे हा व्हिडिओदेखील आता सोशल मीडियात व्हायरल व्हायला सुरुवात झाली असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. पट्टा थोडा छोटा असल्याचं एकानं लिहिलं आहे, तर महिलेची या जाचातून सुटका करायला हवी, असं दुसऱ्यानं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या