दुचाकीवरच अनोख्या अंदाजात तरुणीला केलं प्रपोज; हा खास VIDEO एकदा बघाच सहसा ट्रेनच्या इंजिनसमोर आल्यावर अगदी मोठ्या वाहनांचाही चक्काचूर होतो. त्यामुळे ट्रेनच्या इंजिनसमोर (Train Engine) येण्याचं धाडस कोणीही करणार नाही. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या हातांनी ट्रेनचं इंजिन फिरवताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल..
तुम्ही दक्षिण भारतीय सिनेमा बाहुबली नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटात अभिनेता प्रभास अगदी मोठं शिवलिंग आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जाताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून नेटकरी या व्यक्तीला खऱ्या आयुष्यातील बाहुबली म्हणत आहेत. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की या व्यक्तीने हे काम इतक्या सहज कसं केलं. मात्र अनेकांचं सध्या असंही म्हणणं आहे की यासाठी या व्यक्तीने हायड्रालिक पंपाची मदत घेतली आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हा व्यक्ती ट्रेनचं इंजिन एका खास जागेवर आणतो आणि ते परत नेण्यासाठी वळवण्याकरता गोल आकाराच्या स्टेजवर आणतो. इथे हायड्रोलिक प्रेशरमुळे हे इंजिन सहन फिरतं. सध्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांनाच हैराण करत आहे. बातमी देईपर्यंत 6 मिलयनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 4 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे.