नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. लग्नाच्या सीझनमध्येही अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. कारण या महिन्यात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) येतो. कपल्स वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. यादिवशी अनेकजण आपलं प्रेम समोरच्यापुढे व्यक्त करत असतात. विंचू आणि विषारी सापांपासून बनवली जाते ही डिश; रेसिपी पाहूनच उडेल थरकाप, VIDEO सध्या अशा एका जोडप्याचा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Marriage Proposal on Bike) होत आहे. यात एका व्यक्तीने अनोख्या पद्धतीने तरुणीला प्रपोज केल्याचं पाहायला मिळतं. तुम्ही आजपर्यंत प्रपोज करण्याच्या अनेक पद्धती पाहिल्या असतील मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील पद्धत अतिशय अनोखी आहे (Propose on Bike). दुताकीस्वाराने अगदी वेगळ्या अंदाज तरुणीला प्रपोज केलं.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक व्यक्ती आपली दुचाकी घेऊन रस्त्यावरून चालला आहे. गाडीच्या मागच्या सीटवर एक तरुणी बसलेली आहे. इतक्यात त्या दुचाकीच्या पुढे आणखी तीन दुचाकीस्वार येतात. यातील एका दुचाकीस्वाराच्या टी-शर्टवर लिहिलेलं असतं Marry तर दुसऱ्याच्या शर्टवर लिहिलेलं असतं Me आणि तिसऱ्या दुचाकीस्वाराच्या टी-शर्टवर प्रश्नचिन्ह असतं. अविवाहित, व्हर्जिन पुरुषाचा प्रायव्हेट पार्टसोबत नको तो खेळ; पाहून डॉक्टरही शॉक तिन्ही दुचाकीस्वारांच्या शर्टवरील मजकूर Marry Me? असा आहे. यानंतर हा व्यक्ती दुचाकी चालवताना आपल्या पॉकेटमधून अंगठी काढतो आणि या तरुणीला प्रपोज करतो. तरुणीदेखील हे प्रपोजल स्विकारते. हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट यूट्यूबवर शेअर केला गेला आहे. व्हिडिओ आतापर्यंत १ मिलियनहून अधिकांनी लाईक केला आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक करत असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.