मुंबई, 07 जानेवारी : अल्लादीनचा जादुई दिवा आणि जादुई चटईबाबत तुम्ही ऐकलं असेल. पण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ते जादुई ब्लॅंकेट (Blanket video). विज्ञान, डॉक्टरही जे करू शकले नाही ते या जादुई ब्लॅंकेटने करून दाखवलं आहे. व्हिलचेअरवर असलेली एक दिव्यांग व्यक्ती ब्लॅंकेट हातात येताच फक्त आपल्या पायावर उभी राहिली नाही तर चक्क कोणत्याही आधाराशिवाय सरसर चालूही लागली (Man on wheelchair started walking after got blanket). सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी ब्लँकेट्सच वाटप केलं जातं. डिजीटल साक्षरता मिशनमार्फतही दिव्यांगाना असे ब्लँकेट देण्यात आलं. त्याचा व्हिडीओही शूट करण्यात आला. त्यावेळी तिथे घडलेला एक चमत्कारही कॅमेऱ्यात कैद झाला. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जादुई पांघरूण, मिळताच व्हिलचेअरवर बसलेली व्यक्ती चालू लागली, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. अवघ्या 26 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं या व्हिडीओत तुम्हीच पाहा. हे वाचा - अंगमेहनत नाही, वॉशिंग मशीनचीही गरज नाही; कपडे धुण्याचा देशी जुगाड व्हिडीओ पाहाच व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती व्हिलचेअरवर बसली आहे. त्या व्यक्तीच्या शेजारी आणखी दोन व्यक्ती उभ्या आहेत. ज्या त्याला ब्लँकेट देत आहेत. यानंतर व्हिलचेअरवरील व्यक्ती सर्वांसमोर आपल्या भावना व्यक्त करते.
या व्यक्तीचं बोलणं ऐकाल तर ती आपलं नाव रमेश सिंह असल्याचं सांगतं. तसंच आपण दिव्यांग आहोत असं सांगून आपल्याला दिलेल्या या मदतीचे आभारही मानते. रवी सर यांनी आम्हा दिव्यांग लोकांना या योग्य समजलं आणि ब्लँकेट दिले. मी रवी सरांचे आभार मानतो. असं ही व्यक्ती बोलते. त्यानंतर अगदी आरामात ती या व्हिलचेअरवरून उठते आणि नुकतीच स्वतःला दिव्यांग म्हणणारी ही व्यक्ती चक्क आपल्या दोन पायांवर उठून चालू लागते. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? जिवंत बेडकाच्या पोटात पेटते लाइट; VIDEO VIRAL हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युझर्सनी ही व्यक्ती हातापायांनी नाही तर डोळे किंवा कानाने दिव्यांग असावी असं म्हटलं आहे. तर काहींनी या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. काही नेटिझन्सनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. या ब्लँकेटची तुलना अल्लादिनच्या चटईशी केली आहे. वैद्यकीय जगाला यापेक्षा अधिक काय हवं अशी प्रतिक्रियाही काही युझर्सनी दिली.