व्हायरल व्हिडीओ
मुंबई 29 डिसेंबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे तुम्ही रस्ते अपघाता संदर्भात देखील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. खरंतर रस्त्याने चालताना आपण नेहमीच सतर्क राहण्याची गरज आहे. कारण केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. जे हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. तर काही व्हिडीओमध्ये भयानक अपघातातून देखील अनेकांचे प्राण वाचल्याचे तुम्ही पाहिले असेल. अशावेळी एकत या व्यक्तीचं नशीब चांगलं असतं किंवा मग त्यादिवशी यमराज सुट्टीवर असावा. असंच आपण म्हणतो. हे ही पाहा : ‘‘वो स्त्री है कुछ भी कर सकती है’’, बसमध्ये चढणाऱ्या तरुणीचा Video एकदा पाहाच या व्हिडीओमधील व्यक्तीसोबत देखील असाच प्रकार घडलेला पाहायला मिळत आहे. काही सेकंदाच्या फरकाने त्याचा जीव वाचला आहे. नाहीतर त्याच्यासोबत काय घडेल हे काही वेगळं सांगायला नको. आधी हा व्हिडीओ पाहा हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. ज्यामध्ये एक तरुण छत्री घेऊन झाडाखाली उभा असतो, तेव्हा त्याला कसला तरी आवाज येतो. जेव्हा तो वरती पाहातो तेव्हा त्याला दिसतं की झाड पडणार आहे. तेव्हा तो सेकंदाचाही विलंब न करता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण या तरुणाचा तोल जातो आणि तो खाली पडतो. हा तरुण खाली पडताच त्याच्या बाजूला हे झाड पडते. नशीबाने ते झाड या तरुणावर पडत नाही. पण तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की हा तरुण जर तेथनू बाजूला झाला नसता, तर त्याच्यासोबत काय घडलं असतं.
शिवाय त्याच्या पोटाच्या अगदी जवळत झाडाची जाड फांदी पडली. जर ती फांदी त्याच्या डोक्यात पडली असती, तर ते फारच महागात पडलं असतं. या व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. लोकांना या व्यक्तीच्या नशीबानं आश्चर्यचकीत केलं आहे. आज यमराज सुट्टीवर असावा, असं देखील अनेकांचं म्हणण आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील तसं नक्की वाटेल.
पण या व्यक्तीच्या जवळ असलेल्या कुत्र्याचं काय झालं हे कळू शकलेलं नाही. @BornAKang या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला अनेक लाईक आणि शेअर्स देखील मिळाले आहेत.