गायीने केला तरुणावर हल्ला.
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : गाय तशी शांत प्राणी . शक्यतो ती कुणावर हल्ला करत नाही. पण जेव्हा वेळ येते, तेव्हा तीसुद्धा रूद्र रूप धारण करू शकतो. अगदी चवताळलेल्या बैलापेक्षाही ती भारी पडू शकते. अशाच एका संतप्त गाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. असह्य छळानंतर शांत गोमातेने आपला रुद्रावतार धारण केला आणि छळणाऱ्या तरुणाला तिथंच भयानक शिक्षा दिली. चवताळलेल्या गायीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक तरुण गायीला त्रास देत होता किंबहुना तिचा छळच करत होता. गायीच्या स्वभावानुसार तिने बराच वेळ ते सहन केलं. पण नंतर तिची सहनशीलतेची मर्यादाही संपली आणि मग मात्र ती चवताळली. तिने छळ करणाऱ्या तरुणाव भयंकर हल्ला केला. हे वाचा - छोटं पिल्लू समजून सिंहाच्या छाव्याला गोंजारायला गेला तरुण; पुढे जे घडलं ते धक्कादायक; पाहा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू सकता एका गायीला दोरीनं बांधलेलं आहे. ही दोरी एका तरुणाच्या हातात आहे. तो तरुण त्या गायीला त्रासही देतो आहे. कधी लाथेने मार, कधी शेपटी खेच. तरी गाय शांत आहे. ती शांतपणे तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तरुण तिच्या मागोमाग जातो आणि तिला पुन्हा त्रास देऊ लागतो. तेव्हा मात्र गाय भडकते. ती मागे येते आणि त्या तरुणावर हल्ला करते. तरुणाला आधी डोक्यावर घेऊन आपटते. त्यानंतर त्याला पायाखाली तुडवते आणि चिरडतानाही दिसते. तिला त्रास देणारा तरुण सोडून ती दुसऱ्या कुणावरच हल्ला करताना दिसत नाही. गायीचं असं रूप पाहून तरुणही बिथरलेला दिसतो. हे वाचा - कधी पाहिलंय हत्तीला पाणीपूरी खाताना? हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल गायीने तरुणाला चांगलीच अद्दल घडवली. हा धडा त्याला आयुष्यभर लक्षात राहिल. यापुढे कोणत्याच प्राण्याला त्रास देण्याची हिंमत हा तरुण करणार नाही.
@gharkekalesh ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. जशी करणी, तशी भरणी अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.