JOIN US
मराठी बातम्या / Viral / बटर कापण्यामुळे नात्याचा THE END? ब्रेकअपपर्यंत कसं पोहोचलं प्रकरण वाचा

बटर कापण्यामुळे नात्याचा THE END? ब्रेकअपपर्यंत कसं पोहोचलं प्रकरण वाचा

अगदी किरकोळ सवयीही कधी तरी मोठा काही निर्णय घ्यायला भाग पाडू शकतात. एका व्यक्तीला आपल्या गर्लफ्रेंडची बटर वापराबद्दलची सवय आवडली नाही. तेव्हा त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि चक्क ओपिनियन पोल घेतलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 सप्टेंबर : निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं रंग-रूप दिलं आहे. प्रत्येकाचा स्वभावही वेगवेगळा असतो. म्हणूनच प्रत्येक माणूस एकच काम वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. एकाची काम करण्याची पद्धत दुसऱ्याला कदाचित आवडणारही नाही; पण म्हणून ती व्यक्ती त्यावरून दुसऱ्या कोणाला ओळखू शकत नाही. ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी आपल्याकडे असलेली म्हणही याच गोष्टीकडे निर्देश करते; मात्र तरीही काही जण सवयीवरून किंवा एखादं काम करण्याच्या पद्धतीवरून समोरच्या व्यक्तीला पारखण्याची चूक करतात आणि त्यावरून काही मोठा निर्णयही घेतात. याचंच एक उदाहरण अलीकडे पाहायला मिळालं. एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या (Girlfriend) एका छोट्या सवयीवरून तिला जज केलं आणि त्याबद्दल सोशल मीडियावर एक मोठी पोस्टही शेअर केली. ती बाब इतकी किरकोळ आहे, की ते वाचून कोणाला पटकन ते खरंही वाटणार नाही. कोणी असा विचारही करू शकणार नाही, की अगदी किरकोळ सवयीही कधी तरी मोठा काही निर्णय घ्यायला भाग पाडू शकतात. एका व्यक्तीला आपल्या गर्लफ्रेंडची बटर वापराबद्दलची सवय आवडली नाही. तेव्हा त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि चक्क ओपिनियन पोल घेतलं. रेडिटवर त्या व्यक्तीने एक मोठी पोस्ट केली आणि त्यात लिहिलं, की त्याची गर्लफ्रेंड बटरचा (Butter) वापर वेगळ्याच पद्धतीने करते. ती पद्धत अगदीच काही विचित्र किंवा वेगळी आहे असं नाही; मात्र त्यावरून त्या व्यक्तीने सोशल मीडियावर बराच गोंधळ घातला.

‘‘आमच्या वेळेला कुठे होते असे शिक्षक?’’ हा क्यूट VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल

संबंधित बातम्या

मिररने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या व्यक्तीला आपल्या गर्लफ्रेंडची बटर कापण्याची पद्धत आवडली नाही. रेडिटवर त्याने सांगितलं, की त्याच्या पार्टनरने बटरच्या मोठ्या डब्यातून बटर निम्मं काढलं. तिने बटर डब्याच्या वरच्या बाजूने काढण्याऐवजी अर्ध्यावरून कापून काढून बाहेर काढलं होतं. त्या व्यक्तीने बटर काढण्याची ही पद्धत चुकीची असल्याचं पोस्टमध्ये लिहिलं होतं. पोस्ट वाचून अनेकांनी त्याच्या विचारांना आणखी खतपाणी घातलं. काही जणांनी तर त्याला असाही सल्ला दिला, की त्याने या गर्लफ्रेंडसोबतच्या रिलेशनशिपबद्दल (Relationship) विचार करण्याची गरज आहे. राष्ट्रगीतामध्ये लपलाय भारताचा पूर्ण नकाशा, या ओळीबद्दल असा विचार तुम्ही कधीच केला नसावा; पाहा व्हिडीओ u/DifficultySalt4231 अशा नावाच्या अकाउंटवरून या व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. ‘माझी नवी पार्टनर या पद्धतीने बटर वापरासाठी काढते. ती सीरियल किलर आहे का?’ असा प्रश्न त्याने आपल्या पोस्टमध्ये विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर म्हणून अनेकांनी या प्रकाराचं समीक्षणच सुरू केलं. अनेकांनी त्या व्यक्तीला अशा गर्लफ्रेंडशी ब्रेकअपचा (Breakup) सल्ला दिला. काही जणांनी हेही सांगितलं, की बटर कापण्याच्या मुद्द्यावरून ब्रेक-अप करण्याची काही गरज नाहीये. दोघांनी स्वतःसाठी स्वतंत्र भांडी ठेवावीत, असा सल्लाही काही जणांनी दिला. एका नेटिझनने असं सांगितलं, की ‘ती बटरचा वापर बेकिंगसाठी करत असेल; म्हणून तिने अशा प्रकारे बटर काढलं असेल.’ आता प्रत्यक्षात काय झालं असेल, ते फक्त त्यांनाच ठाऊक; पण बटर काढण्याची पद्धत न आवडणं, त्यावरून सोशल मीडियावर पोस्ट करणं आणि त्यावरून इतरांनी त्यांना ब्रेकअपचे सल्ले देणं, या साऱ्याच गोष्टी अनाकलनीय आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या