JOIN US
मराठी बातम्या / Viral / नदीत मासे पकडण्याची हौस ठरली जीवघेणी, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

नदीत मासे पकडण्याची हौस ठरली जीवघेणी, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

पातळी वाढल्यानं एका खडकाचा आधार घेऊन उभा राहिला. बराच वेळ त्याने नदीकाठावरील लोकांना मदतीसाठी आवाज दिला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरदा, 1 ऑगस्ट: मासे पकडण्यासाठी भर पवासात नदीवर जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. नदीला आलेल्या पुरात तरुण अडकल्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हरदाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नदीत मासे पकडायची हौस महागात पडली. मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आणि तरुण अडकला. नदी पार करण्यासाठी तरुणाला कठीण होऊ लागले. मुसळधार पाऊस आणि वाढत्या नदीच्या प्रवाहामुळे तरुण घाबरला आणि त्यानं थेट पाण्यात उडी घेतली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा- …आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, अद्भुत VIDEO VIRAL मध्य प्रदेशातील जूनापानी गावातील रहिवासी कालीमाचक नदीत मासेमारीसाठी गेला. पाणी पातळी वाढल्यानं एका खडकाचा आधार घेऊन उभा राहिला. बराच वेळ त्याने नदीकाठावरील लोकांना मदतीसाठी आवाज दिला. मात्र प्रवाह वेगानं वाढत होता. त्यामुळे कोणीही जीव धोक्यात घालून त्याला वाचवायला आलं नाही. नदीचा प्रवाह वेगान वाढत असल्याचं पाहून स्वत:ला वाचवण्याच्या नादात हा तरुण खाली पडला आणि प्रवाहासोबत वाहू लागला. अद्याप या तरुणाबाबत काही माहिती मिळू शकली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या