JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / माकडाच्या पिल्लाच्या डोक्यात अडकला तांब्या, 3 दिवस आईची बाळासाठी घालमेल

माकडाच्या पिल्लाच्या डोक्यात अडकला तांब्या, 3 दिवस आईची बाळासाठी घालमेल

आई आणि बाळाच्या प्रेमाच्या अनेक कहाण्या बघायला, ऐकायला आणि वाचायला मिळतात. अशाच बाळाच्या चिंतेत अस्वस्थ झालेल्या आईचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील आहेत. शहरात माकडाच्या पिल्लाचं डोकं तीन दिवस तांब्यात अडकलं होतं. या सगळ्या प्रकाराने घाबरलेल्या त्याच्या आईने त्याला तीन दिवस छातीशी घट्ट कवटाळून ठेवलं होतं. शेवटी तांब्या आपोआपच निघाला. आता माकडाच्या पिल्लाची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे.

0105

तीन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील एका शहरात माकडांची टोळी वनविभागाच्या लाकडाच्या साठवणीजवळ आला होता. कडक उन्हामुळे माकडे तहानलेली होती. लाकडाच्या साठवणीत काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्याचे एका तांब्यात पाणी ठेवलं होतं. एका माकडाच्या पिल्लाने पाणी प्यायला भांड्यात डोके घालण्याच्या प्रयत्न केला. त्याची तहान भागली. पण तांब्या डोक्यात अडकला.

जाहिरात
0205

तांब्यात डोकं अडकल्यामुळे पिल्लू बेचैन झालं. आपल्या मुलाला अडकलेलं पाहून त्याची आई आणि सर्व माकडे आवाज करू लागली. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं. लोकांनी माकडांना बिस्किटे खाऊ घातली आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. परंतु, बरेच प्रयत्न करूनही त्यांना त्याचं डोकं बाहेर काढता आलं नाही. असं 3 दिवस चाललं. दरम्यान, माकडाच्या पिल्लाची आई आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती. तिने त्याला तिच्या छातीशी घट्ट पकडून ठेवलं होतं.

जाहिरात
0305

तीन दिवस या पिल्लाला काही खाता-पिता आलं नाही. यामुळे, भुकेने आणि तहानेने पिल्लाचा मृत्यू होण्याचा धोका वाढत होता. मात्र, सुदैवाने तिसर्‍या दिवशी तांब्या आपोआप निघाला. त्यानंतर माकडांनी आणि शहरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जाहिरात
0405

तज्ज्ञांच्या मते, माकडे नेहमी कळपात राहतात. कळपातील प्रत्येक पिल्लासोबत सर्व माकडे पालकाच्या भूमिकेत राहतात. त्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांची काळजी घेणं हे सर्व मिळून करतात. सर्व माकडे मुलांप्रती अत्यंत संवेदनशील असतात.

जाहिरात
0505

उन्हाळ्यात, जेव्हा जंगलातील सर्व जलस्रोत आटतात आणि अन्न उपलब्ध होत नाही, तेव्हा अनेकदा माकडांचे कळप खेडी आणि शहरांकडे जातात. अन्नाच्या, पाण्याच्या शोधात हा कळपही शहरात आला. दरम्यान ही घटना घडली. माकडाचे पिल्लू आता पूर्णपणे बरे असल्याचं वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी सांगितलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या