JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! महिलेच्या कानात घुसला खेकडा आणि...; VIDEO पाहून तुम्हीही हादराल

OMG! महिलेच्या कानात घुसला खेकडा आणि...; VIDEO पाहून तुम्हीही हादराल

समुद्रावरील मजा महिलेला चांगलीच महागात पडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : कानामध्ये घोण, कोळी किंवा असे छोटे-मोठे किटक गेल्याची प्रकरणं आपल्याला माहिती आहेत. पण कानात कधी खेकडा घुसल्याचं ऐकलं आहे का? एका महिलेच्या कानात चक्क खेकडा घुसला आहे. बीचवर फिरायला गेलेल्या या महिलेच्या कानामध्ये हा खेकडा घुसला (Crab in ear) ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. समुद्र, नदी अशा ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथं काही जलचरांपासून आपल्याला धोका उद्भवतो. जसं समुद्रात शार्कसारखा अवाढव्य मासा असू शकतो किंवा नदीत एखादी मगर. शार्क आणि मगरीच्या हल्ल्याचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिलेले आहेत. पण बीचवर फिरायला गेलेल्या या  महिलेवर कोणत्या माशाने किंवा मगरीने हल्ला केलेला नाही. तर तिच्या कानात चक्क एक खेकडा घुसला आहे (Crab in woman ear).

संबंधित बातम्या

खेकडा किती करकचून धरतो हे आपल्याला माहितीच आहे. त्यात कान हा नाजूक अवयव.  कानात काही घुसलं तर ते बाहेर काढणं मुश्किल असतं. शिवाय यामुळे कानात दुखापत झाल्यास श्रवणक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, किंबहुना बहिरेपणाही येऊ शकतो.  आता या महिलेच्या कानात खेकडाच घुसल्यावर तिची काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी. हे वाचा -  6 महिन्यांपासून पोटात होता मोबाईल; युवकाला कल्पनाही नव्हती, डॉक्टरही शॉक व्हिडीओत पाहू शकता एक महिला उभी आहे, तिच्यासमोर काही लोकही उभे आहेत. महिला बिलकुल हलत नाही आहे. पण ती खूप घाबरलेली आहे. तिला घाम फुटल्याचं दिसतं आहे. त्यानंतर एक व्यक्ती हातात चिमटा घेऊन त्या महिलेच्या कानाजवळ नेतं. चिमटा कानात टाकतं आणि कानात घुसलेल्या खेकड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. हे वाचा -  Oh no! कर्ल्स करायला गेली आणि केसांचा पुंजकाच हातात आला; VIDEO पाहून व्हाल शॉक जसा चिमटा महिलेच्या कानात जातो, तसा खेकडा महिलेच्या कानातून बाहेर येतो. खेकडा कानातून बाहेर येताच महिला सुटकेचा निःश्वास सोडते. ती आनंदाने उड्या मारू लागते. व्हायरल हॉग ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या