रुग्णाला नेताना अचानक तुटली लिफ्ट.
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : तुम्ही लिफ्टमध्ये गेला असालच. बिल्डिंग असो, मॉल असो किंवा आणखी कोणत्या उंच इमारती जिथं लिफ्ट असतेच. कधी ना कधी तुम्हाला लिफ्टमध्ये अडचणीचा सामना करावा लागला असेल. म्हणजे कधी लिफ्ट खूप हळू जात असेल, कधी काही कारणामुळे लिफ्ट मध्येच बंद पडली असेल. शिवाय लिफ्ट दुर्घटनेच्या काही भयंकर दुर्घटनाही तुम्हाला माहिती असतील. असे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. रुग्णालयात तुम्ही पाहिलं असेल रुग्णाला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरून नेण्यासाठी रुग्णालयाचे कर्मचारी लिफ्टचा वापर करतात. रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून त्याला लिफ्टमधून नेलं जातं. या व्हिडीओतही या रुग्णाला असंच नेलं जात होतं. तेव्हाच भयंकर दुर्घटना घडली. रुग्ण अगदी लिफ्टच्या मधोमध असताना अचानक लिफ्ट तुटली. पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला धडकीच भरेल. हे वाचा - VIDEO - शेजारी गेलेला मुलगा घरी परतलाच नाही; बिल्डिंगच्या लिफ्टचं CCTV फुटेज पाहून सर्व हादरले व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून लिफ्टमध्ये नेलं जात आहे. रुग्णालयाचे दोन कर्मचारी आणि सोबत त्या रुग्णाची नातेवाईक आहे. एक कर्मचारी स्ट्रेचर घेत आत जातो. स्ट्रेचर अर्ध लिफ्टच्या आत आणि अर्ध लिफ्टच्या बाहेर असतं. म्हणजे स्ट्रेचरवरून रुग्णाचं धड आत आणि पाय बाहेर असतात.
रुग्णालयाचा दुसरा कर्मचारी लिफ्टच्या बाहेर असतो. तो स्ट्रेचर आत ढकलत असतो तोच अचानक लिफ्ट तुटते आणि दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट खाली जाऊ लागते. तेव्हा धडकीच भरते. हे वाचा - तुम्ही लिफ्टमध्ये असताना जर केबल तुटली तर काय करावं? चुकूनही ह्या गोष्टी करू नका! सुदैवाने कसंबसं रुग्णाला पूर्णपणे आत ढकललं जातं. जर तो मध्येच अडकला असता तर त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले असते. पण तरी रुग्ण आणि कर्मचारी लिफ्टच्या आत अडकून तसेच खाली गेले. या दुर्घटनेत त्यांचं पुढे काय झालं हे माहिती नाही.
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे कसं झालं. रुग्ण आणि रुग्णालयाचा कर्मचारी सुरक्षित असो, अशी मी प्रार्थना करतो. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.