JOIN US
मराठी बातम्या / Viral / भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून पडला चिमुकला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून पडला चिमुकला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

प्रत्येकजण या मुलासारखा नशिबवान असेलच असं नाही. थोडासा बेजबाबदारपणा लहान मुलांच्या जीवावर बेतू शकतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लहान मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यांचा खेळकरपणा किंवा सतत काहीतरी करत राहण्याची गोष्ट जिवावर येऊ शकते. आता एक असा व्हिडिओ समोर येत आहे ज्यात मुलाने धावत्या गाडीचा दरवाजा उघडल्याने रस्त्यावर पडला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अनेकांनी मुलं गाडीत असताना काळजी घ्या असं आवाहन केलं आहे. गाडीतून रस्त्यावर मुलगा पडल्याचा हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र, एका आयपीएस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर करत पालकांनी काळजी घ्यावी असं म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून मुलगा रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून येणाऱ्या गाडीने जोरात ब्रेक मारला. तेव्हा लहान मुलगा ज्या गाडीतून पडला त्यातील एका व्यक्तीने लगेच पळत येऊन मुलाला उचलले. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. थोडासा बेजबाबदारपणा चिमुकल्यांच्या जीवावर बेतू शकतो.

संबंधित बातम्या

आय़पीएस पंकज नैन यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, गाडीमध्ये लहान मुलं असताना चाइल्ड लॉक आणि चाइल्ड सिट खूप महत्वाचे आहे. सर्व दरवाजे नीट बंद झाले आहेत का बघा. चाइल्ड लॉक केल्याची खात्रीही करून घ्या. सर्वच मुलं या मुलासारखी लकी नसतात. पाहा VIDEO : कोल्ह्याचं लय भारी टॅलेंट! सिंहापासून जीव वाचवण्यासाठी केली मरण्याची अॅक्टिंग गाडीत बसल्यावर लहान मुलं बऱ्याचदा दरवाजाशी खेळत असतात. उड्या मारणे, खिडकीतून बाहेर डोकावणं असे प्रकार सुरू असतात. अशावेळी त्यांच्याकडे पालक गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. Video : टेक ऑफ करताना निखळलं विमानाचं चाक, मग लँडिंग कसं झालं?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या