JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : पुरातून वाहणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी घेतली उडी; जीवाचीही पर्वा केली नाही

Video : पुरातून वाहणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी घेतली उडी; जीवाचीही पर्वा केली नाही

जीवाची पर्वा न करता या तरुणाने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी घेतली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 26 जुलै : यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील बोरी अरब येथील नदीला आलेल्या पुरात एकजण वाहून गेला होता. यादरम्यान एका तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात उडी घेऊन त्या व्यक्तीचा जीव वाचविला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. बोरी अरब येथील नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता पुल तयार करण्यात आला होता. मात्र आता नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत  होतं. तरी सुध्दा काही जण जीव धोक्यात घालून पुलावरून जाण्याची हिंमत करत आहे. अशातच तिघे जण पाण्यातून जात असताना अचानक अडाण नदीचं पाणी वाढलं. त्यातील एक व्यक्ती वाहून गेला. मात्र त्य व्यक्तीला तेथील एका तरुणाने वाहत्या पाण्यात उडी घेऊन वाचवले.

जीवाची पर्वा न करता या तरुणाने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी घेतली. दरम्यान राज्याच्या विविध भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. या मुसळधार पावसाने अनेक भागातील नद्यांची पाणी पातळी घटली आहे. तर पूरही ओसरला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पाऊस चिंता वाढवणार असल्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील पावसासंदर्भात एक इशारा दिला आहे. राज्यात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज असताना संपूर्ण महिना कोरडा गेला होता, त्यानंतर जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यभरात दमदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसाळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या