JOIN US
मराठी बातम्या / Viral / मेहुण्या शेर तर दाजी सव्वाशेर! नवरदेवाचे बूट पळवता पळवता फुटला घाम; पाहा Video

मेहुण्या शेर तर दाजी सव्वाशेर! नवरदेवाचे बूट पळवता पळवता फुटला घाम; पाहा Video

नवरदेवाचे बूट पळवणं मेहुण्यांना काही जमलं नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 सप्टेंबर : नवरा-नवरी (Bride groom video) यांच्याप्रमाणे लग्नात (Wedding video) चर्चेत असतात ते दीर (Brother in law) आणि मेहुणी (Sister in law). मेहुण्यांची मस्ती आणि दाजीच्या मस्करीशिवाय लग्नसमारंभाची  (Jija saali video) मजा येत नाही.  लग्नातील बूट चोरीचा (Jutta chori video) खेळ म्हणजे मेहुण्यांचा हक्कच. नवरदेवाचे बूट चोरून ते परत करण्यासाठी नवरदेवाकडून चांगलीच रक्कम घेतात (Jutta chupai video). बूट चोरण्यासाठी त्या काहीही करू शकतात. पण अशा शेर मेहुण्यांना सव्वाशेर दाजी मिळाला तर… मग काय या खेळाची रंगत अधिकच वाढते, सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो. आधी नवरदेवाचे बूट हे त्याच्या नकळत, गप्पपणे लपवले जायचे. आता मात्र अगदी नवरदेवाच्या समोर किंबहुना नवरदेवाच्या पायातलेच बूट मेहुण्या पळवताना दिसतात. असेच पायातील बूट पळवण्यासाठी आलेल्या मेहुण्यांना चांगलाच घाम फुटला. नवरदेवाने असं काही केलं की मेहुण्यांना सहजासहजी बूट पळवता आले नाही. त्याच्या पायातील बूट काढणंच त्यांच्यासाठी मोठं चॅलेंज झालं.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता नवरदेव आणि नवरीबाई स्टेजवर एकमेकांशेजारी बसले आहेत. तेव्हा मेहुण्या तिथं येतात आणि त्या नवरदेवाच्या पायातील बूट खेचून काढण्याचा प्रयत्न करतात. काही जणांनी नवरदेवाचे हात धरले आहेत. तर मेहुण्या त्याच्या पायातून बूट काढण्यासाठी धडपडत आहेत. हे वाचा -  नवरदेव बूट देईना म्हणून सटकली; लग्नमंडपातच मेहुणीने भावोजीसोबत काय केलं पाहा VIDEO पण मेहुण्यांसारखाच नवरदेवही हुशार. त्याने आपले पाय जमिनीवर इतके घट्ट ठेवले की बूट काढणं दूर मेहुण्यांना त्याचा पायही उचलता येत नव्हता. मेहुण्यांनाही बराच प्रयत्न करून पाहिला पण त्यांना काही ते शक्य होत नव्हतं. त्यांची अवस्था बेकार झाली. शेवटी त्यांची अवस्था पाहवली नाही म्हणून नवरदेवानेच हार पत्करली आणि त्याने आपले दोन्ही पाय वर केले. जसे त्याने पाय वर केले तसे तरुणींनी त्याचा पायातील बूट काढले. त्यांनी उभं राहून एक सुटकेचा निःश्वास टाकला. सर्व जणी किती दमल्या होत्या ते व्हिडीओत दिसतेच. डोक्यावरील घाम पुसतानाही त्या दिसतात. हे वाचा -  अरे यांना आवरा! लग्नातच भिडले वधू आणि वरपक्ष, बुटासाठी घातला राडा; VIDEO VIRAL शादी वादी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या