दिल्ली, 17 मार्च: काही सर्वांत लोकप्रिय स्ट्रीट फूड कॉम्बोजबद्दल बोलायचं झाल्यास सामोसा आणि जिलेबी यांचे कॉम्बिनेशन सर्वांत टॉपला येते. रसाळ जिलेबी आणि नंतर तिखट मसालेदार सामोसा (Samosa Jalebi Lovers) खाण्यात मजा येते. दोन्ही पदार्थ एकामागे एक खाण्याची मजाच वेगळी असते. परंतु जिलेबी आणि सामोसा (Weird Food Combination) हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खायला कोणालाच आवडणार नाही. सध्या एका शेफचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्याने या सामोसा आणि जिलेबी (Viral Video of Jalebi Samosa) हे दोन पदार्थ एकत्र केले आहेत. या शेफचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट्स करत असून, या विचित्र कॉम्बोवरून त्याला ट्रोल करत आहेत. खाद्यपदार्थांचे असे विचित्र कॉम्बो (weird food combo) यापूर्वी कोमी ऐकले किंवा पाहिले नव्हते असं नाही; पण हा प्रयोग खरंच वेगळा आणि तितकाच विचित्र आहे. गुलाबजामुन पराठे, रसगुल्ल्याची भेळ आणि विचित्र आइस्क्रीम रोल्सनंतर आता एका फेरीवाल्याने बटाट्याऐवजी जिलेबीने भरलेले सामोसे तयार केले आहेत. हा विचित्र कॉम्बो पाहून अनेक जण या फेरीवाल्यावर चिडले आहेत. ‘सलमानला टफ द्यायचं की काय’ वर्तुळ मोजणाऱ्या ललितच्या फोटोने कल्ला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे, की विक्रेत्याने सामोसे बनवले आहेत. परंतु त्याचा आत्मा म्हणजेच मसालेदार बटाटे काढून त्या जागी गोड जिलेबी ठेवली आहे. ही व्यक्ती आधी पिठाचे बनवलेले सामोसे पाण्याने चिकटवते आणि नंतर त्यात जिलेबीचे तुकडे करून भरते. जिलेबीचं स्टफिंग भरल्यावर त्याला सामोशाप्रमाणे पॅक करून गरम तेलात ते तळलं जातं. या व्हिडिओच्या मागून येणारी कॉमेंट्री ऐकून तुम्हाला या शेफचा राग आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हायरल व्हिडिओ दिल्लीचा (delhi viral video) असल्याचं म्हटलं जात आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर radiokarohan नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन दिली आहे, ‘नमस्कार मित्रांनो, सामोसे आणि जिलेबी दोन्ही सोडण्याची वेळ आली आहे.’ दरम्यान, व्हिडिओ अपलोड झाल्यापासून हजारो जणांनी तो पाहिला आणि लाइक केला आहे; मात्र कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी या भन्नाट प्रयोगाला खूप शिव्या दिल्या आहेत. एका युझरने तर लिहिलंय - हा सामोसा रशिया-युक्रेनला पाठवा, जेणेकरून ते हा प्रयोग पाहून लढायला विसरतील आणि युद्ध थांबेल. काही जणांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सामोसा आणि जिलेबी खाणं कायमचं सोडून देण्याची शपथ घेतली आहे.