JOIN US
मराठी बातम्या / Viral / दर 6 महिन्यांनी देश बदलणारे बेट! कारण आहे खूपच मनोरंजक, 350 वर्षांची परंपरा

दर 6 महिन्यांनी देश बदलणारे बेट! कारण आहे खूपच मनोरंजक, 350 वर्षांची परंपरा

या जगात अनेक प्रकारची बेटे आहेत. पण तुम्हाला अशा कोणत्या बेटाबद्दल माहिती आहे का, जे एकाच वेळी दोन देशांनी व्यापलेले आहे?

जाहिरात

दर 6 महिन्यांनी देश बदलणारे बेट!

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : पृथ्वीवर काही गोष्टी इतक्या विचित्र आणि अनाकलनीय आहेत की त्या माणसाच्या बुद्धीसाठी कायमच आव्हान ठरतात. पृथ्वीवर अशा अनेक जागा आहेत, ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ज्या भूभागांचा शोध लागलाय, त्याच्याभोवतीची गूढता कायम आहे. पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरात अशी अनेक बेटं आहेत जिथे आजही मनुष्यवस्ती नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हीदेखील बेटंच आहेत. पण त्यांच्या भोवतीही छोटी-छोटी अनेक बेटं आहेत. परंतु, तुम्ही एखाद्या अशा बेटाबद्दल ऐकंलय की जे दर सहा महिन्यांनी आपला देश बदलतं. देश बदलतं म्हणजे भौगोलिक परिस्थितीमुळे ते बेट एकदा या देशाच्या हद्दीत गृहित धरलं जातं तर एकदा दुसऱ्या देशाच्या हद्दीत. अशा प्रकारचं एक बेट पृथ्वीवर अस्तित्वात आहे. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. जगावेगळं असं हे बेट फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांच्या मधोमध वसलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट ही की, या भूभागावरून दोन्ही देशांमध्ये कुठलाच तंटा नाही. यामुळे आलटून-पालटून या बेटाची मालकी दोन्ही देशांकडे असते. अशाप्रकारे हे गेले 350 वर्षं अव्याहतपणे सुरू आहे. 1659 साली फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांमध्ये या बेटाच्या मालकी हक्कावरून शांतता पाळण्याचं ठरवण्यात आले. अर्थात, हे एका कराराअंतर्गत ठरवलं गेलं. या कराराला पायनीय करार म्हटलं जातं. फार पूर्वी या बेटाच्या मालकी हक्कावरून दोन्ही देशांमध्ये खूप युद्ध झाली होती. वाचा - OMG! सूर्यावर दिसला चक्क फिरता साप: VIDEO पाहून शास्त्रज्ञही झाले हैराण दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हे बेट 200 मीटर लांब पसरलेलं आहे. तर याची रूंदी 40 मीटर इतकी आहे. करारानुसार दरवर्षी, हे बेट 1 ऑगस्टपासून 31 जानेवारीपर्यंत फ्रान्सच्या ताब्यात असतं. तसंच 1 फेब्रुवारी पासून 31 जुलैपर्यंत स्पेनच्या ताब्यात असतं. या बेटाचं फिजैंट असं नाव आहे. या बेटांच्या समूहाला फॅन्सेस द्वीपकल्प म्हणूनही ओळखलं जातं. हे जगातलं एकमेव असं बेट आहे, जे दोन देशांमध्ये विभागलं गेलं आहे. तसंच दोन्ही देश शांतता कराराचं पालन करून 6-6 महिने यावर नियंत्रण ठेवतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या