Anastasia Radzinskaya
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: सात वर्षाचं वय तसंही खेळण्याचं असतं. पण इतक्या लहान वयातही काही मुलं आर्थिक कमाई करण्यास सुरु करतात. आता अशीच एक सात वर्षाची मुलगी आहे जी महिन्याखेरीज कोटीत(7 Years Old YouTube Star) पैसे कमावते. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण हो हे खरं आहे. ज्या वयात मुलं शाळेत शिकायला लागतात, त्याच वयात अनास्तासिया रॅडझिंस्काया (Anastasia Radzinskaya) नावाची 7 वर्षांची मुलगी इंटरनेटवर यशाची पताका फडकवत आहे. अनास्तासिया ही जगातील सर्वात मोठी युट्यूब स्टार (Kid YouTube Stars)बनली आहे आणि ती महिन्याला £120,000 पेक्षा जास्त म्हणजेच 1 कोटी 21 लाख रुपये कमवते. ती युट्युबवर तिच्या अलिशान जीवनाशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असते. इंटरनेटवर तिची लोकप्रियता इतकी जास्त आहे की युट्यूबसह इतर प्लॅटफॉर्मवरदेखील तिचे चाहते पाहायला मिळतात. ही मुलगी जगातील सर्वात मोठी किड यूट्यूबर म्हणून ओळखली जाते. अनास्तासियाच्या यूट्यूब चॅनेलला 250 दशलक्ष लोक फॉलो करतात, ती दरवर्षी 28 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 2 बिलियन कमावते.
अनास्तासिया रॅडझिंस्कायाने इंस्टाग्राम अकाऊंटवरही तिच्या अलिशान जीवनासंबंधी पोस्ट शेअर केल्या आहेत. विशेष म्हणजे या छोट्या वयात ती प्रायव्हेट जेटने प्रवास करते. तिच्या या यशामागे एक रंजक गोष्ट आहे. अनास्तासियाला लहान वयातच मेंदूचा आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, जरी नंतर हे चुकीचे निघाले, परंतु या गोंधळात तिच्या पालकांनी निर्णय घेतला. त्यांनी नोकरी सोडून यूट्यूबवर अनास्तासियासाठी Like Nastya नावाचे चॅनेल सुरु केले. यापूर्वी या चॅनेलवर शिक्षणाशी संबंधित प्रकल्प दाखवले जात होते, जे अनास्तासियासाठी होते. 2 वर्षातच या चॅनेलला चांगली प्रसिद्धी मिळाली. गेल्या वर्षी, हे चॅनल YouTube च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चॅनेलपैकी एक बनले आहे. मुलीने इतके कमावले आहे की ती 18 व्या वर्षी आरामात निवृत्त होऊ शकते. ती तिच्या चॅनेलवर वेगवेगळे कंटेंट टाकत असते, ज्यामध्ये अनेक मुलांसाठी प्रेरणादायी असतात आणि अनेक मजेशीर असतात. सध्या, अनास्तासिया रॅडझिंस्काया जगभरातील मुलांसाठी एक परिचित चेहरा आहे.