प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
मुंबई, 20 जानेवारी : नूडल्स म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. अगदी शेजवान नूडल्स राइस, नूडल्स फ्रँकी असे नूडल्सपासून बनवलेले एक ना दोन कितीतरी पदार्थ तुम्ही खात असाल. अगदी रस्त्याशेजारीही अशी नूडल्सची दुकानं थाटलेली दिसतात. पण हे नूडल्स कुठून येतात, कसे बनतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? नूडल्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहिल्यानंतर नूडल्स चवीने खाणं दूर तुम्ही खाण्याचा विचारही करणार नाही. नूडल्सच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ज्या ठिकाणी, ज्या पद्धतीने हे नूडल्स बनवले जात आहेत, पॅकिंग केले जात आहेत, ते पाहूनच तुम्हाला उलटी येईल. नूडल्स नको असेच तुम्हाला वाटतील.असं या व्हिडीओत नेमकं काय आहे ते पाहा. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक छोटीशी फॅक्ट्री आहे. जिथं बरेच कर्मचारी नूडल्स बनवत आहेत. पीठ मळण्यापासून ते लाटून, ते मशीनच्या मदतीने धाग्यासारखे कापण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया ग्लोव्ह्जशिवायच केली जाते आहे. नूडल्स तयार झाल्यानंतर ते अस्वच्छ जमिनीवर फेकले जात आहेत. त्यानंतर ते साध्या प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केले जात आहे. हे वाचा - तुम्हीही आवडीने चहासोबत खाता टोस्ट? मग एकदा हा VIDEO पाहाच, खाण्याआधी कराल विचार हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पीएफसी क्लबचे संस्थाप चिराग बडजात्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “तुम्ही रस्त्यावर शेजवान सॉसह चाइनीज हक्का नूडल्स कधी खाल्ले होते?” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. त्यानंतर फॅक्टरीत हे नूडल्स कसे तयार होतात ते दाखवलं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बघूनच बहुतेकांना उलटी आली आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. यांच्यावर कारवाई करा, हा कारखान बंद करा, अशी मागणीही अनेकांनी केली आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन जरूर सांगा.