JOIN US
मराठी बातम्या / Viral / जनता कर्फ्यू : कोरोनाशी लढणाऱ्यांना कचरा वेचणाऱ्याने भररस्त्यात 'असा' केला सलाम, पाहा VIDEO

जनता कर्फ्यू : कोरोनाशी लढणाऱ्यांना कचरा वेचणाऱ्याने भररस्त्यात 'असा' केला सलाम, पाहा VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशभरात रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी पाठिंबा दिला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशभरात रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नागरिकांनी टाळ्या, थाळी वाजवून देशसेवा करणाऱ्या लोकांचे आभार मानले. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रविवारी सायंकाळी 5 वाजता लोकांनी घरातच टाळ्या आणि थाळी वाजवली. यातून कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी रुग्णालयात सेवा करणारे डॉक्टर, जवान, पोलिसांसह अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सलाम करण्यात आला. भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग यानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक कचरा गोळा करणारी व्यक्ती रस्त्यात उभा राहून टाळ्या वाजवताना दिसते. कचरा गोळा कऱणाऱ्या व्यक्तीने रस्त्याच्या मधे उभा राहून देशसेवा करणाऱ्या लोकांचे आभार मानल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका घरासमोर रस्त्यावर उभा असलेला आणि खांद्याला पिशवी अडकलेला हा माणूस टाळ्या वाजवत आहे. व्हिडिओमध्ये तो टाळ्या वाजवत असताना इतर लोकही थाळी वाजवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना हरभजन सिंगने म्हटलं की, आम्ही सर्व एक आहोत.

संबंधित बातम्या

देशभरात जनता कर्फ्यू लागू कऱण्यात आला होता. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 पर्यंत लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं. या आवाहनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनी चौबे, गिरीराज सिंग यांच्यासह भाजपच्या अनेक मंत्री आणि खासदारांनी टाळी आणि थाळी वाजवून कोरोनाशी लढा देणाऱ्यांचे आभार मानले. हे वाचा : तंबाखूची तलफ आल्यानं कर्फ्यूदरम्यान बाहेर पडला, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या