JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! हा चमत्कार की संकट? पाण्यासोबत आगही ओकतोय Hand pump; विचित्र घटनेचा Video

बापरे! हा चमत्कार की संकट? पाण्यासोबत आगही ओकतोय Hand pump; विचित्र घटनेचा Video

पाणी आणि आग एकत्र येणाऱ्या हँडपम्पचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

जाहिरात

हँडपम्पमधून एकाच वेळी निघतंय पाणी आणि आग.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 25 ऑगस्ट : पाणी-आग दोघंही एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे सामान्यपणे आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो आणि पाण्याला आग लागत नाही. असं असताना एका घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका पाण्याच्या हँडपम्पमधून चक्क पाण्यासोबत आगही बाहेर पडते आहे. मध्य प्रदेशमधील हे दृश्य पाहून सर्वजण भयभीत झाले आहेत. कुणी याला चमत्कार म्हटलं आहे तर कुणी संकट. मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील कछार गावातील ही घटना आहे. जिथं रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी सुरुवातीला हॅंडपम्पमधून पाण्याचा फवारा उडताना पाहिला. या पाण्यासोबत आगही बाहेर पडत होती. खाली पाणी आणि त्यावर आग असं दृश्य पाहून सर्वजण घाबरले. त्यांनी याची माहिती प्रशासनानला दिली. ग्रामस्थांनी सांगितलं की सुरुवातीला इथून पाणी निघालं, त्यानंतर आग आणि आता पाणी-आग दोन्ही एकत्र निघत आहेत.  गावात अशी घटना याआधी कधीच झाली नाही. आधीच पाण्याची कमतरता त्यात पाण्यातून निघणारी आग यामुळे नागरिक चिंतेत आहेत.

जसजशी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तसतसे लोक हे दृश्य पाहायला यायला लागले. त्यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा -  धावत्या कारसोबत थरार! चाकातून अचानक येऊ लागल्या आगीच्या ठिणग्या आणि… पाहा VIDEO बहुतेकांनी याला चमत्कार म्हटलं आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, याचा नीट तपास केल्यानंतरच यामागील नेमकं कारण सांगता येईल.  तर तज्ज्ञांच्या मते, हे केमिकलमुळे होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या