JOIN US
मराठी बातम्या / Viral / Oh no! कर्ल्स करायला गेली आणि केसांचा पुंजकाच हातात आला; VIDEO पाहून व्हाल शॉक

Oh no! कर्ल्स करायला गेली आणि केसांचा पुंजकाच हातात आला; VIDEO पाहून व्हाल शॉक

हेअरस्टाइल करण्याच्या नादात महिलेचे केसच आले हातात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : कुणाला स्ट्रेट (Straight hair) तर कुणाला कर्ली हेअर (Curly hair) आवडतात. आता नैसर्गिकरित्या असे केस नसले तरी कृत्रिमरित्या असे केस करता येतात (Hair style). अगदी यासाठी स्ट्रेटनिंग आणि कर्लिंग मशीनही उपलब्ध आहेत. ज्याचा वापर करून अगदी घरच्या घरीही तात्पुरत्या स्वरूपात आपल्या हवे तसे केस मिळतात. पण ही हौस महागातही पडू शकते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका तरुणीने अशाच मशीनने हेअर कर्लिंग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर केस कुरळे होणं दूर केस तुटून केसांचा पुंजकाच तिच्या हातात आला. ते पाहून तरुणाला हादराच बसला. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्काच बसले.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता तरुणी हेअर मशीनने आपले केस कुरळे करताना दिसते आहे. कानाजवळील थोडे केस ती त्या मशीनभोवती गुंडाळते. एका हातात त्या केसांचं टोक आणि दुसऱ्या हातात मशीन धरून ती हलक्या हाताने प्रेस करत हळूहळू खेचते. तेव्हा मशीनसोबत तिचे केसही येतात. केस तुटूतात आणि केसांचा पुंजकाच तिच्या हातात येतो. ते पाहून महिला शॉकच होते. हे वाचा -  अरे बापरे! माकडाने मालकाच्या डोक्यावर केले तलवारीने वार; VIDEO VIRAL बेस्ट व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या