JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नाच्या स्टेजवरच रूसली नवरीबाई; मनवण्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनी केलं मन जिंकणारं काम, VIDEO

लग्नाच्या स्टेजवरच रूसली नवरीबाई; मनवण्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनी केलं मन जिंकणारं काम, VIDEO

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव लग्नाच्या स्टेजवर उभा राहातात. वरमाळेचा कार्यक्रम अजून पूर्ण झालेला नसतो. याआधीच काहीतरी कारणावरुन नवरीबाई नवरदेवावर रागवते

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : देशात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात सोशल मीडियावर सतत लग्नातील निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओ हसवणारे असतात तर काही व्हिडिओ मन जिंकणारे असतात. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नवरदेवाच्या मित्रांचं कौतुक वाटेल. हा व्हिडिओ नवरी-नवरदेव आणि त्याच्या मित्रांचा आहे.

सप्तपदीसाठी वाट बघत होता नवरदेव; नवरी भलत्याच कामात मग्न, VIDEO

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की लग्नाच्या स्टेजवरच नवी नवरी आपल्या नवरदेवावर नाराज होते (Angry Bride). यानंतर नवरदेवाचे मित्र आपल्या वहिनीला मनवण्यासाठी अतिशय खास प्लॅन करतात. नवरदेवाचे सगळे मित्र नवरीला मनवण्यासाठी जे काही करतात, ते मन जिंकणारं आहे. याचा व्हिडिओ (Wedding Video Viral) सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव लग्नाच्या स्टेजवर उभा राहातात. वरमाळेचा कार्यक्रम अजून पूर्ण झालेला नसतो. याआधीच काहीतरी कारणावरुन नवरीबाई नवरदेवावर रागवते. यानंतर नवरदेव तिच्यासोबत बोलून तिला मनवण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरीबाई ऐकत नाही. यानंतर नवरदेवाचे सगळे मित्र कान पकडून नवरीची माफी मागतात. व्हिडिओच्या खाली दिलेल्या मजकुरानुसार, वरातीमधील लोकांनी आपला डान्स बराच वेळ सुरूच ठेवल्याने नवरीच्या एन्ट्रीला उशीर झाला, याच कारणामुळे ती नाराज आहे.

Kacha Badam नंतर पेरू विकणाऱ्या आजोबांचं गाणं व्हायरल; VIDEOचा इंटरनेटवर धुमाकूळ

व्हिडिओमध्ये दिसतं की नवरदेवाचे मित्र नवरीला मनवण्यासाठी काम पकडून उठाबशाही काढतात. यानंतर लग्नातील पूर्ण वातावरणच बदलतं आणि नवरीदेखील खूश होते. व्हिडिओमध्ये तुम्ही नवरदेवाच्या मित्रांना डान्स करतानाही पाहू शकता. नवरदेवाचे सगळे मित्र ज्यापद्धतीने स्टेजच्या समोर उभा राहून नवरीची माफी मागतात, ते मन जिंकणारं आहे. हा व्हिडिओ witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला गेला असून आतापर्यंत 1 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या