भोपाळ 01 डिसेंबर : ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ ही जुनी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. मात्र स्वतःच्याच लग्नात नवरदेव ‘दीवाना’ झाला तर बातमी होणारच. सोशल मीडियावर (Social Media) मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बुरहानपूर येथील एका अशाच नवरदेवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Dance Video of Groom) होत आहे. हा नवरदेव स्वतःच्याच लग्नात डीजेचा आवाज ऐकून आऊट ऑफ कंट्रोल झाला. गाण्यांचा आवाज ऐकून तो थेट डीजेच्या गाडीच्या छतावरच चढला आणि डान्स करू लागला. गाडीवर चढत त्याने अशा प्रकारे ठुमके लगावले की पाहणारे सगळेच हसू लागले. डीजेचा आवाज जितका वाढत होता, तितक्याच वेगाने हा नवरदेव डान्स करत होता. कदाचित याठिकाणी नवरदेवाच्या आवडीचं गाणं वाजत होतं. कदाचित याच कारणामुळे नवरदेव आऊट ऑफ कंट्रोल झाला आणि थेट छतावर चढूनच डान्स करू लागला. बुरहानपूरच्या लालबाग स्टेशन रोडवरुन ही वरात निघाली होती. वरातीत डीजे साउंडही होता. डीजेच्या फिल्मी गाण्यांवर नवरदेवाचे मित्र आणि नातेवाईक थिरकत होते.
तोपर्यंत सगळं अगदी सहज सुरू होतं. मात्र, अचानकच नवरदेव आऊट ऑफ कंट्रोल झाला. नवरदेव स्वतःला आवरू शकला नाही आणि घोड्यावरुन खाली उतरला. यानंतर आधी त्याने आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत भरपूर वेळ डान्स केला. यानंतर १५ फूट उंच डीजेवर चढून तो डान्स करू लागला. हे दृश्य पाहून वरातीत सहभागी सगळेच हैराण झाले. लोक या नवरदेवाचे फोटो आपल्या फोनमध्ये काढू लागले.
नवरदेव जास्तच जोशात असल्याचं दिसताच घरच्यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितलं. मात्र नवरदेव काही खाली उतरायला तयार नव्हता. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आपल्या एका ज्येष्ठ नातेवाईकांच्या सांगण्यावरुन नवरदेव अखेर खाली उतरला आणि बोहल्यावर चढला. यानंतर वरात पुढे निघाली. मात्र तोपर्यंत नवरदेवाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. े