wedding
नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी: सोशल मीडिया (Social media) अस प्लॅटफॉम आहे ज्याच्यावर अनेक भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या एका लग्नातील (wedding)असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आहे. मात्र, हा व्हिडीओ नवरा नवरीमुळे चर्चेत आला नसून दोघांच्या बहिण भावामुळे चर्चेत आला आहे. एका लग्न समारंभात बूट चोरीच्या कार्यक्रमा दरम्यान वराचा भाऊ वधूच्या बहिणींसोबत भांडतो. त्यानंतर काय झाले ते तुम्हीच पहा. लग्न समारंभात बूट चोरणे हा वधुच्या बहिणीचा मान असतो. ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. मात्र, वराच्या भावाला काही ते पटले नाही. तो वधुच्या बहिणीशा वाद घालायला लागतो. सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर पूजेपूर्वी उभे असल्याचे दिसत आहे. वर त्याचे बूट काढत आहे. वर त्याचे जोडे काढून बाजूला ठेवतो. वराचा जोडा काढताच वराचा भाऊ चपला धरायला लागतो, तेवढ्यात मागून एक हात येतो जो चपला चोरण्याचा प्रयत्न करतो आणि चपला हिसकावून घेतो.
वराचे जोडे काढताच वधूच्या बहिणी बूट चोरू लागतात. त्यानंतर वराचे भाऊ आणि वधूच्या बहिणींमध्ये काही वेळ भांडण होते. त्यानंतर वराचा भाऊ बूट सोडतो आणि वधूच्या बहिणीं बूट घेऊन निघून जातात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारपेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले आहे.