JOIN US
मराठी बातम्या / Viral / गाजर किंवा दुधी नाही तर चक्क हिरव्या मिरचीचा हलवा! तुम्ही कधी खाल्ला आहे का?

गाजर किंवा दुधी नाही तर चक्क हिरव्या मिरचीचा हलवा! तुम्ही कधी खाल्ला आहे का?

तुम्ही याआधी गाजर तसंच दुधी भोपळ्याचा हलवा नक्कीच खाल्ला असेल. हलवा म्हटलं की आपल्याला गाजर, दुधीचा हलवा आठवतो आणि तो गोड असतो. मात्र, हिरव्या मिरचीचा हलवा (Green Chillies Halwa) कधी खाल्लाय का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जानेवारी: तुम्ही याआधी गाजर तसंच दुधी भोपळ्याचा हलवा नक्कीच खाल्ला असेल. हलवा म्हटलं कि आपल्याला गाजर, दुधीचा हलवा आठवतो आणि तो गोड असतो. मात्र, हिरव्या मिरचीचा हलवा (Green Chillies Halwa) कधी खाल्लाय का? हो. हिरव्या मिरचीचा हलवा. हिरव्या मिरचीच्या हलव्याच्या या पोस्टने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या हलव्याची चव पण माहित नाही तरीही तो चर्चेत आहे. हिरव्या मिरचीला स्वयंपाकात अनन्यसाधारण महत्व आहे. इतकं कि, देशातील कोणत्याही भागात जा तेथे रोजचं जेवण मिरची टाकल्याशिवाय पूर्णच होणार नाही. मात्र, काही जण हिरवी मिरची तिखट असल्याकारणाने, त्यापासून चार हात लांब राहणंच पसंत करतात. हिवाळ्यासाठी हिरव्या मिरचीचा हलवा - याआधी तुम्ही गाजराचा, दुधी हलवा खाल्लाही असेल. मात्र, हिरव्या मिरचीचा हलवा तुम्ही कधी पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर हिरव्या मिरचीचा हलवा (Green Chillies Halwa) नेटकऱ्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो एखाद्या कार्यक्रमातल्या रिसेप्शनचा दिसतोय. त्या हिरव्या मिरचीच्या हलव्याचा क्लोजअप फोटो राणा सफी या ट्विटर युजरने शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

या फोटोमध्ये हिरव्या मिरचीच्या हलव्यात मनुका टाकल्याचे दिसत आहे. तसेच हिवाळ्यासाठी हिरव्या मिरचीचा हलवा अशी कॅप्शन दिली आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया या पोस्टला काही दिवसातच शेकडो लाइक्स मिळाले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया आल्या आहेत. यावर एका यूजरने विचारले कि, ‘मी हिरव्या मिरचीच्या हलव्याबद्दल प्रथमच ऐकत आहे. तुम्ही करण्याचा प्रयत्न केला का?’. यावर एकाने उत्तर दिलंय, ‘हे चांगलं होतं. काही वर्षांपूर्वी लग्नात खाल्ला होता.’ ‘याबाबत कधी ऐकलं नव्हतं. मात्र, चांगला दिसतोय हा पदार्थ,’ अशीही एकाने कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने तर हिरव्या मिरचीचा हलवा काय काँबिनेशन आहे. असं म्हटलंय. हे वाचा- 79 दिवसांपासून फक्त कच्च मांस खातोय हा व्यक्ती; कारण जाणून व्हाल शॉक हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा नुसती हिरवी मिरचीही तुम्ही कधीतरी ढोकळ्यासोबत खाल्ली असेल. पण हलवा म्हणजे आश्चर्यकारक आहे. पण हा हलवा म्हणजे वेगळाच प्रकार आहे. खरं तर हा हलवा गोड आही कि तिखट हेही कुणाला माहीत नाही. पण नेटवर फोटो पडला की त्याची चर्चा जोरदार होते आणि ती झाली की त्याची बातमीही व्हायला वेळ लागत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या