JOIN US
मराठी बातम्या / Viral / नातवाने `हा` हटके प्रश्न विचारताच आजीने दिलं लाजून उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

नातवाने `हा` हटके प्रश्न विचारताच आजीने दिलं लाजून उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओत नातू त्याच्या आजीला काही हटके प्रश्न विचारतोय आणि आजी देखील दिलखुलासपणे पण काहीशी लाजत त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. हा व्हिडिओ नेटिझन्सला कमालीचा आवडत आहे. तुम्हीदेखील या व्हिडिओचा हसून आनंद घ्याल.

जाहिरात

आजी-नातू व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : सोशल मीडियावर रोज मनोरंजक, माहितीपर आदी वेगवेगळ्या विषयावरील व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओंना नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर हा व्हिडिओ जुना आहे. पण व्हिडिओतील कंटेट मनोरंजक असल्याने तो वारंवार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका आजी आणि नातवाच्या संभाषणाचा आहे. या व्हिडिओत नातू त्याच्या आजीला काही हटके प्रश्न विचारतोय आणि आजी देखील दिलखुलासपणे पण काहीशी लाजत त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. हा व्हिडिओ नेटिझन्सला कमालीचा आवडत आहे. तुम्हीदेखील या व्हिडिओचा हसून आनंद घ्याल. या व्हिडिओत नेमकं काय आहे. आजी आणि नातवाचा कोणत्या विषयावर संवाद सुरू आहे, या विषयी सविस्तर जाणून घेऊया. `नवभारत टाइम्स`ने या विषयीची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर सध्या आजी आणि नातवामध्ये सुरू असलेल्या हटके संवादाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ या पूर्वीदेखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील आजी आणि नातू भोजपुरीत संवाद साधत आहेत. या व्हिडिओतील आजीबाईंची प्रतिक्रिया नेटिझन्सला खूप आवडत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील tarun_dasil या हँडलवरून 14 नोव्हेंबरला शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये `आजीशी विचित्र संभाषण`, असं लिहिलं आहे.आतापर्यंत ही क्लिप 25 लाखांहून अधिकवेळा पाहिली गेली आहे. या व्हिडिओला 2 लाख 63 हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत तर शेकडो युझर्सने या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हेही वाचा - मित्राच्या लग्नात इतका नाचला की मंडपातच तरुणाचा झाला धक्कादायक शेवट; पाहा Live Video या व्हिडिओत, ``तुला एक प्रश्न विचारू का,`` असं एक युवक त्याच्या आजीला विचारतो. त्यावर त्याची आजी विचार बेटा असं उत्तर देते. त्यानंतर नातू विचारतो की, ``आजी तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली?`` त्यावर आजी मी 75 वर्षांची आहे, असं उत्तर देते. ``मी जेव्हा 12 वर्षांची होते, तेव्हा माझं लग्न झालं.``, असं आजी सांगते.त्यानंतर नातू आजीला विचारतो की, ``तू कधी आजोबांची पप्पी घेतली होतीस का?`` त्यानंतर आजी ``अरे बापरे`` अशी प्रतिक्रिया देत लाजते. आजीचं लाजणं नेटिझन्सच्या मनाला खूप भिडलं आहे. नातवाच्या प्रश्नावर आजीने लाजून उत्तर दिलं आहे. मात्र आजीचं उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पाहायला हवा. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालादेखील काही वेळ हसू आवरणार नाही.

संबंधित बातम्या

या व्हिडिओवर नेटिझन्सनं खास कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सने या संवादावर सुंदर अशी कमेंट केली आहे. ``आमच्या बिहारमध्ये आजी अशीच लाजते,`` असं काही युजर्सनं कमेंटमध्ये म्हटलं आहे. ``हा बिहारी अंदाज आमचं मन जिंकतो,`` असं एका युजरनं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या