ब्रिटनमध्ये राहणाऱ्या लिडिया मकारचुक आणि तिचा पती नॉर्बर्ट वर्गा यांना युक्रेनमध्ये हनिमून साजरा करणं चांगलंच महागात पडलं आहे. महायुद्धातला बाँब इतक्या वर्षांनी फुटला आणि… पाहा PHOTOS
लिडिया आणि नॉर्बर्ट हे आपला हनीमून साजरा करण्यासाठी यूक्रेनला गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर काही मित्रदेखील होते. हे सगळे लोक रात्री पार्टी करत असताना अचानक जमिनीखालून एक मोठी बॉम्बस्फोट झाला. त्यात हे कपल जखमी झालं आहे.
रात्रीच्या वेळी बाहेर टेंट लावून हे कपल गप्पा मारत होते. त्यावेळी नॉर्बर्ट हा आपला कॅमेरा घेण्यासाठी सरसावला तेव्हा जोरदार बॉम्बचा धमाका झाला. त्यात लिडियाचा भाऊ आणि त्याच्या एका मित्राचा मृत्यू झाला तर लिडिया मकारचुकला गंभीर दुखापत झाली. तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर मोठ्या जखमा झाल्या आहेत.
या घटनेविषयी लिडिया म्हणाली की 'आता सगळं ठिक आहे, तो बॉम्बचा धमाका फार जोरात होता. त्यात काही अणकुचीदार दगडं माझ्या चेहऱ्यावर लागलेली आहेत. परंतु मला नंतर कळलं की या घटनेत माझ्या भावाचा मृत्यू झालेला आहे.'
समोर आलेल्या रिपोर्टनुसार या लोकांनी हनीमूनच्या दरम्यान रात्रीच्या वेळी टेंटमध्ये जाळ केला होता. त्यामुळं हा बॉम्बस्फोट झाला आहे. हा बॉम्ब 1916 साली ब्रुसिलोवर केलेल्या आक्रमणावेळी पुरला गेला होता, असं सांगण्यात येत आहे.