नवी दिल्ली 20 डिसेंबर : प्रेमात माणसाला जात-धर्म, रंग या गोष्टी दिसत नाहीत, असं म्हणतात. तसंच मैत्री करतानाही काही लोकं समोरच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती, कुटुंबाची पार्श्वभूमी याकडे लक्ष देत नाही. ते फक्त आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करतात. एका 19 वर्षांच्या तरुणीची अशीच मैत्री सध्या चर्चेत आहे, जी थोड्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने घडली आहे. मुलीने पार्टीला जाण्यासाठी कॅब बुक केली होती पण वाटेत तिने ड्रायव्हरशी मैत्री केली आणि त्याच्यासोबत फिरत राहिली. जिथं तिला थोडा वेळ प्रवास करायचा होता, तिथे ती ड्रायव्हरसोबत 7 तास हिंडली. स्वत: मुलीने तिच्या प्रवासाबद्दल लोकांना सांगितलं आहे की तिने 2 लाख रुपये खर्च करून आयुष्यभराची मैत्री मिळवली आहे. ‘योगी’ नवरदेवाला सासऱ्याची खास भेट, कार ऐवजी दिला बुलडोझर, आता जा कामाला! डेली मेलच्या रिपोर्टनुसार, इमोजेन निकोल्सन असं 19 वर्षीय तरुणीचं नाव असून ती ब्रिटनची रहिवासी आहे. या श्रीमंत मुलीला तिच्या आजोबांच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं, त्यासाठी तिने लंडन ते डरहम अशी उबेर कॅब बुक केली. या प्रवासासाठी अनेक वाहनचालकांनी तिला नकार दिला होता, मात्र अखेर तिला 52 हजार 848 रुपयांमध्ये एक कॅब मिळाली. प्रवासादरम्यान, इमोजेनला ड्रायव्हर आवडला आणि ती त्याच्यासोबत डरहममध्ये अनेक ठिकाणी फिरायला गेली. इतकंच नाही तर त्याच्यासोबत परतही आली. या संपूर्ण प्रवासासाठी मुलीला 2 लाख रुपयांचे बिल भरावे लागले, ज्याचे स्क्रीनशॉट तिने शेअर केले आहेत. नशीब असावं तर असं! दररोज भीक मागणारा मुलगा रातोरात झाला कोट्यधीश इमोजेनने सांगितलं की तिचं तिच्या आजोबांवर खूप प्रेम आहे, म्हणून तिने त्यांच्या वाढदिवसाला जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली. वाटेत तिला एवढा चांगला मित्र आणि टॅक्सी ड्रायव्हर मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. संपूर्ण 7 तासांच्या प्रवासात तिने ड्रायव्हरशी खूप गप्पा मारल्या. इतकंच नाही तर कॉफी प्यायली, सँडविच आणि केकही एकत्र खाल्ले. यात त्यांची मैत्री इतकी खास झाली की तरुणीला हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील.