JOIN US
मराठी बातम्या / Viral / तब्येत बरी नसल्याने रुग्णलयात पोहोचली तरुणी; मेडिकल रिपोर्ट पाहताच सरकली पायाखालची जमीन

तब्येत बरी नसल्याने रुग्णलयात पोहोचली तरुणी; मेडिकल रिपोर्ट पाहताच सरकली पायाखालची जमीन

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : माणसाचं शरीर अतिशय वेगळं असतं. अनेकदा शरीरात असं काही घडतं, जे ऐकून कोणीही आश्चर्यचकीत होईल. अनेकदा शरीर आपल्याला ते सिग्नल देत नाही, जे त्याने ठराविक परिस्थितीत द्यायला हवे. जेणेकरून आपल्याला शरीराच्या आतील समस्या समजू शकेल. एका महिलेसोबत असंच घडलं. एक दिवस तिची तब्येत ठीक नसल्याने ती डॉक्टरकडे गेली होती. मात्र, टेस्टमध्ये तिला जे काही समजलं ते हैराण करणारं होतं (Woman Shocked to Know about her Pregnancy).

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : माणसाचं शरीर अतिशय वेगळं असतं. अनेकदा शरीरात असं काही घडतं, जे ऐकून कोणीही आश्चर्यचकीत होईल. अनेकदा शरीर आपल्याला ते सिग्नल देत नाही, जे त्याने ठराविक परिस्थितीत द्यायला हवे. जेणेकरून आपल्याला शरीराच्या आतील समस्या समजू शकेल. एका महिलेसोबत असंच घडलं. एक दिवस तिची तब्येत ठीक नसल्याने ती डॉक्टरकडे गेली होती. मात्र, टेस्टमध्ये तिला जे काही समजलं ते हैराण करणारं होतं (Woman Shocked to Know about her Pregnancy). रोमान्ससाठी महिलेची आहे विचित्र अट; फक्त हेच पुरुष आवडतात, लोकांनी केलं ट्रोल द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, 20 वर्षाची जेस टिकटॉकवर बरीच प्रसिद्ध आहे. ती अनेकदा आपल्या आयुष्याबद्दलचे व्हिडिओ शेअऱ करत राहाते. नुकतंच तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिने एका हैराण करणाऱ्या घटनेचा खुलासा केला. जेसने सांगितलं की जेव्हा ती 18 वर्षाची होती, तेव्हा ती एका व्यक्तीला भेटली आणि तो तिला आवडू लागला. या दोघांना भेटून चार महिने झालेले असतानाच जेसीला एक दिवस रुग्णालयात जावं लागलं. तिने सांगितलं की तिची तब्येत या काळात ठीक वाटत नव्हती. यामुळे तिने रुग्णालयात जाऊन चेकअप करण्याचा निर्णय घेतला. रुग्णलयात चेकअप करून डॉक्टरांनी जेव्हा तिच्या तब्येतीबाबत खुलासा केला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली (Woman Shocked after Seeing Checkup Report). डॉक्टरांनी सांगितलं की ती 26 आठवड्यांची गर्भवती आहे आणि तिला क्रिप्टिट प्रेग्नंसी (Cryptic Pregnancy) आहे. म्हणजेच ती प्रेग्नंसी ज्यात मेडिकल टेस्टिंगमध्येही प्रेग्नंसीबद्दल समजत नाही. यात महिलांना गरोदर असताना उलट्याही होत नाहीत आणि त्यांची मासिक पाळीही सुरूच राहाते. यासोबत पोटही जास्त दिसत नाही. ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र ठिकाणी घातले आक्षेपार्ह कपडे,तिला शहराबाहेर हाकललं जेसने सांगितलं, की तेव्हा अनेकांनी तिची निंदा केली की चार महिन्यातच तू या व्यक्तीच्या इतकी जवळ कशी आली. जेसने सांगितलं की प्रेग्नंसीच्या आधीपर्यंत ती पीरियड्स थांबवण्यासाठी औषधं खात असल्याने मासिक पाळीवरुनही तिला हे समजू शकलं नाही. ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी तिने एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तिच्या बॉयफ्रेंडने तिला साथ दिली आणि दोघं 2 वर्षांपासून सोबत आहेत. त्यांना आता 18 महिन्यांचं बाळही आहे. त्यांनी आपल्यासाठी एक घरही खरेदी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या