JOIN US
मराठी बातम्या / Viral / बॉयफ्रेंडने बनवलेला Resume तरुणीने कंपनीला केला फॉरवर्ड; मजकूर वाचून HR थक्क, Photo Viral

बॉयफ्रेंडने बनवलेला Resume तरुणीने कंपनीला केला फॉरवर्ड; मजकूर वाचून HR थक्क, Photo Viral

हा मजेशीर Resume कंपनीला एका तरुणीने पाठवला होता. Resume ठीक होता मात्र इतक्यात एम्पलॉयरची नजर मेलच्या खाली लिहिलेल्या एका मेसेजवर गेली (Girl Attached Personal Message With Resume).

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : आजकालच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपला चांगला Resume बनवून (Resume Importance) समोरच्या इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. एका चांगल्या Resume च्या आधारावरच कंपनी आपल्या कँडिडेटला सिलेक्ट करते. अशात लोक अगदी उत्तम Resume बनवण्याच्या प्रयत्नात असतात. यासाठी अनेक प्रकारचे अॅप आणि अनेक लोकांचीही मदत घेतली जाते. आता तर अनेक लोक Resume क्रिएट करण्याचंच कामही करतात. नोकरी मिळवण्यासाठी Resume हा पहिला आणि महत्त्वाचा पर्याय आहे. सोशल मीडियावर एका कंपनीने आपल्याकडे आलेल्या अशाच एका Resume चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, जो पाहून लोक खळखळून हसत आहेत.

घासून घासून महिलेने दातांची अक्षरशः लावली वाट; पाहून डेंटिस्टही झाले शॉक

हा मजेशीर Resume कंपनीला एका तरुणीने पाठवला होता. Resume ठीक होता मात्र इतक्यात एम्पलॉयरची नजर मेलच्या खाली लिहिलेल्या एका मेसेजवर गेली (Girl Attached Personal Message With Resume). मेसेज वाचल्यावर समजलं की तरुणीने हा Resume आपल्या प्रियकराकडून बनवून घेतला होता. मात्र कामचोर प्रेयसीने Resume नवीन मेलमध्ये अटॅच करण्याऐवजी तोच मेल फॉरवर्ड केला. यामुळे या मेलच्या खाली लिहिलेला पर्सनल मेसेजही तसाच फॉरवर्ड झाला.

संबंधित बातम्या

प्रियकराने तरुणीचा Resume तर बनवला पण त्याखाली त्याने लिहिलेला मेसेजही कंपनीला फॉरवर्ड झाला. यात लिहिलं होतं, मेरी जान, हा घे तुझा Resume. मी बनवला आहे. एकदा चेक कर, हा ठीक आहे का नाही? काही बदल करायचा असल्यास सांग. यानंतर त्याने मेलमध्ये काही किसिंग इमोजी पाठवले. तरुणीने प्रियकराने पाठवलेला हा मेल तसाच कंपनीला पाठवला. कंपनीने या मजेशीर मेलच्या स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला, इथूनच तो व्हायरल झाला.

दिसायला सुंदर तरी सिंगल! शेकडो तरुणांना डेट करूनही मॉडेलला मिळाला नाही पार्टनर

करिअर कंसल्टेंट निक अकमलने आपल्या इन्स्टाग्रामवरुन हा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. हा मेल एका विद्यार्थीनीने इंटर्नशिपसाठी पाठवला होता. कदाचित तिला Resume बनवायला येत नसल्याने तिने आपल्या प्रियकराकडून बनवून घेतला होता. मेलच्या खाली असलेल्या पर्सनल मेसेजमुळे तो चांगलाच व्हायरल झाला. लोकांनी ही मुलगी अतिशय कामचोर असल्याचं म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या