बँकॉक, 11 फेब्रुवारी : पालीला घाबरणारे बरेच लोक आहेत. बाथरूम किंवा कोणत्याही ठिकाणी पाल दिसली की एखादा वाघ, सिंह यांच्यासारखा हिंस्र प्राणीच समोर दिसावा इतका दरदरून घाम फुटतो. तुम्हीसुद्धा पालीला घाबरून किंचाळला असाल, ओरडला असला. पण एका रेस्टॉरंटमध्ये एका तरुणीने इतकी मोठी पाल पाहिली की तिने भीतीने संपूर्ण रेस्टॉरंटच हादरवून सोडलं. थायलँडमधील एका रेस्टॉरंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या रेस्टॉरंटमध्ये एक विशाल पाल घुसली. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये एकच खळबळ उडाली. महत्त्वाचं म्हणजे या पालीला घाबरून एक तरुणी इतकी घाबरली की ती वाचवा वाचवा असं किंचाळत, ओरडत ढसाढसा रडू लागली. यावेळी मोठ्या पालीपेक्षा या तरुणीच्या आवाजानेच रेस्टॉरंट हादरलं. हे वाचा - 3-3 बलाढ्य सिंहांनाही भारी पडलं एक छोटंसं कासव; कधीच पाहिला नसेल असा VIDEO व्हिडीओत पाहू शकता ही किती मोठी पाल आहे. या पालीला पाहताच ही महिला थेट खुर्चीवर चढली आणि मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडू लागली. त्यानंतर एक तरुण धावत तिच्या मदतीसाठी आला, तो पालीला हुसकावण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या आपल्या हातात पकडायला बघत होता. पण पालही त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तोसुद्धा तिच्याजवळ जायला घाबरत होता.
अखेर तो तरुण एक लांब काठी घेऊन येतो आणि त्या काठीने त्या पालीला खेचत त्या महिलेपासून दूर नेतो. तेव्हा कुठे त्या महिलेच्या दीवात जीव येतो. ती सुटकेचा निश्वास सोडते आणि डोळे फुसताना दिसते. तिच्या घाबरलेल्या चेहऱ्यावर किंचितसं हसूही येतं. हे वाचा - बापरे! …अन् कारचे तुकडे तुकडे झाले; भयंकर अपघाताचा LIVE VIDEO व्हायरल हॉग नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओतील पाल पाहून जितकी धडकी भरते, तितकंच हसू या तरुणीला पाहूनही येतं.