JOIN US
मराठी बातम्या / Viral / Girl’s College बाहेर तरुणाची हिरोगिरी, बेडूक स्टाईलने मारले PUSH UPS, पाहा VIDEO

Girl’s College बाहेर तरुणाची हिरोगिरी, बेडूक स्टाईलने मारले PUSH UPS, पाहा VIDEO

मुलींना इंप्रेस करण्यासाठी आणि सोशल (Frog style push up in girls college video goes viral) मीडियावर फेमस होण्यासाठी एका तरुणाने मुलीच्या कॉलेजबाहेर थेट पुशअप्स मारायलाच सुरुवात केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुलींना इंप्रेस करण्यासाठी आणि सोशल (Frog style push up in girls college video goes viral) मीडियावर फेमस होण्यासाठी एका तरुणाने मुलीच्या कॉलेजबाहेर थेट पुशअप्स मारायलाच सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video goes viral) होत आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियात प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. काहीजण गंभीर प्रकार करतात, तर काहीजण मजेशीर काहीतरी करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. एका कॉलेजवयीन तरुणाचा (Youth does push ups) असाच एक प्रयत्न सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून या व्हिडिओला जोरदार पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या

काय आहे व्हिडिओत? एका गर्ल्स कॉलेजबाहेर तरुण थेट आडवा पडून पुशअप्स मारत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. त्याच्या आजूबाजूला तरुण आणि तरुणी उभ्या राहून मजा घेत आहेत. मात्र यापैकी कुणाचीही पर्वा न करता हा तरूण आपल्याच मस्तीत पुशअप्स मारत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. जिम आणि इंप्रेशन अनेक तरुण तरुणींवर आणि गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन पाडण्यासाठी जिम लावतात. सिक्स पॅक ऍब्स, बायसेप, ट्रायसेप दाखवून मुलींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, यामुळे मुली प्रभावित होतात की नाही, हे नक्की माहित नसलं तरी आपला फिटनेस दाखवण्याची हौस अनेकांना आवरता आवरत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे पुशअप्स या व्हिडिओत तरुण वेगवेगळ्या प्रकारचे पुशअप्स वेगवेगळ्या स्टाईलने मारताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी तो बेडकाच्या स्टाईलने हवेत उडत पुशअप्स मारतो. या तरुणाचा फिटनेस पाहून अनेकांना कौतुक वाटतं. रोजचा सराव असल्याशिवाय असे पुशअप्स मारणं शक्य नाही, देदेखील हा व्हिडिओ पाहताना जाणवतं. हे वाचा- तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार Bhagyashree ची मुलगी अवंतिका! जाणून घ्या डिटेल्स नेटिझन्सकडून कौतुक पुशअप्स मारणाऱ्या तरुणाचं नेटिझन्सकडून जौरदार कौतुक होत आहे. विशेषतः शेवटचा बेडकासारखा उडण्याचा प्रकार तर अनेकांना जाम आवडला आहे. अर्थात, हा प्रकार त्याने मुलींना इंप्रेस करण्यासाठी केला की स्वतःचा फिटनेस दाखवण्यासाठी केला यावरून नेटिझन्समध्ये जोरदार वाद रंगला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या