द्वारका, 18 जून : प्रसिद्ध कथा-प्रवचनकार मोरारी बापू यांनी आपल्या प्रवचनात कृष्णाबद्दल काही वादगद्रस्त विधान केल्याने चिडलेल्या भाजपच्या माजी आमदाराने पत्रकारांसमोरच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्याच खासदार पूनम मदाम यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोरारी बापूंपर्यंत हा नेता पोहोचू शकला नाही. या घटनेचा VIDEO वेगाने VIRAL होत आहे. मोरारी बापू द्वारकेत श्रीकृष्ण मंदिरात दर्शनाला आले होते. तिथे काही माध्यमातल्या प्रतिनिधींशी ते बोलत असतानाच हा प्रकार घडला. भाजपचे माजी आमदार पबुभा माणेक यांनी अचानक हल्ल्याच्या पवित्र्यात मोरारी बापूंकडे झेप घेतली. पण तिथे उपस्थित असलेल्या खासदार पूनम मादाम यांनी मध्ये पडत माणेक यांना दूर केलं. इतर कार्यकर्तेही मध्ये पडले आणि त्यांनी माणेक यांना खोलीतून दूर नेलं. या घटनेचा VIDEO आता समाजमाध्यमांतून फिरत आहे.
मोरारी बापू यांच्या वक्तव्याने आहिर समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. आपला हा हेतू नव्हता असं सांगत मोरारी बापू यांनी वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. दैनिक भास्कर ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशात मिर्झापूर इथे केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी कृष्णाचा भाऊ बलरामाबद्दल काही वक्तव्य केलं. बलराम मद्यपान करीत असे, असं त्यांनी सांगितलं. यामुळे काही भक्तांच्या भावना दुखावल्या. तेव्हापासून मोरारी बापू यांच्यावर आहीर समाजाकडून टीका होत आहे. निषेध चीनचा, पुतळा जाळला पाहा कुणाचा! अतिउत्साही कार्यकर्त्यांचं ज्ञान उघड पबुभा माणेक यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला तेव्हा आहिर समाजाचे नेते उपस्थित होते. भाजपच्या जामनगरच्या खासदार पूनम मदामदेखील उपस्थित होत्या. मोरारी बापू यांनी त्यांच्या वक्तव्याची क्षमा मागण्यासाठी द्वारकेला यावं अशी आहिर समाजाची मागणी होती. त्यानुसार ते द्वारकाधीशाच्या मंदिरात क्षमा मागण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेले होते. त्याच वेळी ही घटना घडली. संकलन - अरुंधती अन्य बातम्या सुशांतच्या निधनाचं दु:ख पचवणं अवघड; त्याच्या लाडक्या कुत्र्यानेही जेवण सोडलं संगीत क्षेत्रातूनही लवकरच आत्महत्येचं वृत्त येऊ शकतं समोर; धक्कादायक खुलासा