JOIN US
मराठी बातम्या / Viral / आश्चर्य! 9 महिने नव्हे तर तब्बल 2 हजार वर्षे आईच्या पोटात होतं बाळ; बाहेर काढताच...

आश्चर्य! 9 महिने नव्हे तर तब्बल 2 हजार वर्षे आईच्या पोटात होतं बाळ; बाहेर काढताच...

Foetus In Womb from 2 Thousand Years : 2000 हजार वर्षे आईच्या पोटात राहिलेल्या बाळाची अवस्था पाहून शास्त्रज्ञही हैराण झाले.

जाहिरात

फोटो सौजन्य - Journal of Archaeological Science

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी : सामान्यपणे आईच्या गर्भात बाळ किती दिवस असतं, असं विचारलं तर कुणीही सांगेल की 9 महिने. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल संशोधकाना असं बाळ सापडलं आहे, जे आईच्या गर्भात 9 महिने नव्हे तर तब्बल 2 हजार वर्षांपासून होतं (Foetus In Womb from 2 Thousand Years). दोन हजार वर्षांनंतर संशोधकांनी बाळाला आईच्या गर्भातून बाहेर काढलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉरसॉच्या (University Of Warsaw) संशोधकांनी एका महिला ममीचा अभ्यास केला. ही ममी इजिप्तमध्ये सापडली होती (Mummy Found In Egypt). या ममीला मिस्टीरियस लेडी (Mysterious Lady) असं नाव देण्यात आलं आहे. ही ममी दोन हजार वर्षे जुनी आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे तिच्या गर्भात दोन हजार वर्षांपासून बाळही होतं. पहिल्यांदाच एका ममीच्या शरीरातून बाळ काढण्यात आलं. हे वाचा -  Shocking! कोरोना लस घेताच वाढली महिलेची ब्रेस्ट साईझ; डॉक्टर म्हणाले… 1826 सालीच ती युनिव्हर्सिटीला देण्यात आली होती. पण गेल्या वर्षीच या ममीच्या गर्भात बाळ असल्याचं समोर आलं. ममीच्या गर्भात 28 आठवड्यांचं भ्रूण सापडलं आहे. इतके वर्ष आईच्या गर्भात झालेल्या या बाळाची अवस्था लोणच्यासारखी झाली होती. त्यामुळेच याचं नावच संशोधकांनी पिकल्ड फिटस असं ठेवलं आहे. त्यामध्ये बरेच अॅसिड आणि रक्ताचे अंश मिळाले आहेत. संशोधकांनी सांगितलं, जेव्हा मृत शरीर ममी म्हणून जतन केलं जातं, तेव्हा त्याच्यावर असा लेप लावला जातो ज्यामुळे त्यामध्ये हवा आणि ऑक्सिजन दात नाही. पूर्ण शरीर सील पॅक होतं. असंच या प्रेग्नंट ममीसोबत झालं. त्यामुळे गर्भाशयात बाळही सील झालं. हे वाचा -  Surrogacy मध्ये जैविक आई-वडील कोण असतात? सेक्सशिवाय मूल कसे जन्माला येते? या महिलेच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही. बाळाला जन्म देताना या महिलेचा मृत्यू झाला नाही, हे संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. कारण बाळ ज्या ठिकाणी होतं, त्यामुळे तिला प्रसूती वेदना झाल्या नव्हत्या असा अंदाज संशोधकांनी व्रतवला आहे. आता या ममीबाबत संशोधक अधिक अभ्यास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या