JOIN US
मराठी बातम्या / Viral / दुर्मीळ मासा जाळ्यात अडकला आणि पालटलं मच्छिमाराचं नशीब; नेमकं काय घडलं?

दुर्मीळ मासा जाळ्यात अडकला आणि पालटलं मच्छिमाराचं नशीब; नेमकं काय घडलं?

ओडिशातल्या एका मच्छिमाराचं नशीब एका दुर्मीळ माशामुळे फळफळलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालासोर (ओडिशा), 16 नोव्हेंबर : कोणाचं नशीब कधी फळफळेल याबद्दल काहीच सांगता येत नाही. कालपर्यंत गरीब असलेला माणूस एका रात्रीत अचानक श्रीमंत झाल्याची अनेक उदाहरणं आपण अनेकदा पाहतो. एखाद्या व्यक्तीला अचानक लॉटरी किंवा जॅकपॉट लागतो आणि तो क्षणार्धात श्रीमंत होतो. काही व्यक्तींना मोठी रक्कम किंवा प्रॉपर्टी बक्षीस म्हणून मिळते आणि त्याचं नशीब बदलतं. ओडिशातल्या एका मच्छिमाराचं नशीब एका दुर्मीळ माशामुळे फळफळलं आहे. या माशामुळे तो एका रात्रीत लखपती झाला आहे. हा मासा खूप दुर्मीळ मानला जातो. औषधांच्या निर्मितीसाठी या माशाच्या अवयवांचा वापर केला जातो. त्यामुळे या माशाचं मोल खूप जास्त आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. समुद्रात मासेमारी करताना या मच्छिमाराच्या जाळ्यात अत्यंत दुर्मीळ आणि वजनदार मासा अडकला आणि यामुळे त्याचं नशीब बदलून गेलं आहे. या दुर्मीळ माशाची एक लाख रुपयांना विक्री झाली आहे. सध्या या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा मच्छिमार आणि माशाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. `एनडीटीव्ही`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ओडिशातल्या बालासोरमधल्या मच्छिमाराच्या जाळ्यात एक अत्यंत दुर्मीळ मासा अडकला. मार्लिन उर्फ सेलर मार्लिन असं या माशाचं नाव आहे. हा मासा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. या दुर्मीळ माशाविषयी माहिती देताना सहायक मत्स्यव्यवसाय अधिकारी पार्थसारथी स्वॅन यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. हेही वाचा -  लग्नात नवरा-नवरीकडून अशा कॉन्ट्रॅक्टवर साईन, आता प्रत्येक महिन्याला मिळणार फ्री पिझ्झा या माशाच्या अवयवांचा वापर करून डिप्रेशनवर उपचारांसाठी वापरली जाणारी औषधं तयार केली जातात, असं सांगितलं जात आहे. या मच्छिमारानं हा मासा एक लाख रुपयांना विकला आहे. समुद्रात अनेक रहस्यमय सजीव अस्तित्वात आहेत. हे सजीव खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखे असतात. असाच एक दुर्मीळ मासा एका मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला. या माशाचं वजन तब्बल 550 किलोग्रॅम आहे. माशाची ही प्रजाती मांसाहारी आहे. या माशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा मासा बालासोरच्या समुद्रात सापडला आहे. या दुर्मीळमाशाला खूप मोठी किंमत मिळाल्यामुळे या मच्छिमाराचं नशीब अनपेक्षितरीत्या फळफळलं असून, त्यामुळे तो खूप आनंदित झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या