जयपूर, 5 जानेवारी: मध्यरात्रीच्या (Midnight) सुमाराला आकाशातून (Sky) अचानक एक आगीचा गोळा (Fire ball like asteroid) जमिनीच्या (Land) दिशेने झेपावला आणि जोरदार धमाका झाल्याची घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे. साधारणतः एलियन्स आणि अवकाश या संदर्भातल्या बातम्या या ऐकीव आणि अतिशयोक्तीच्या वाटू शकतात. मात्र सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाल्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
अशी घडली घटना राजस्थान मधील नागौर परिसरात ही घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. रात्रीच्या सुमाराला आकाशातून आगीचा एक गोळा जमिनीकडे झेपावल्याचं या व्हिडिओ दिसतं. ह्या बरोबरच मोठा प्रकाश देखील आजूबाजूच्या परिसरात पडला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी अद्याप समोर आला नसल्याची माहिती आहे. मात्र परिसरातील एका हॉटेलच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात ही घटना कैद झाली आहे. खगोलशास्त्रीय प्रक्रिया आकाशातून अनेकदा तुटतात आणि त्या जमिनीकडे झेपावतात. आकाशाकडे नजर लावून बसणाऱ्या अनेकांना अशा प्रकारे तारा तुटण्याच्या घटना पाहता येतात. मात्र या उल्का जमिनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विझून जातात. त्यामुळे त्यांचा प्रकाशही मंद असतो आणि ही प्रक्रिया पृथ्वीपासून कोट्यावधी किलोमीटर अंतरावर होत असते. राजस्थान मध्ये घडलेला प्रकारही याच श्रेणीतील असावा, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. हे वाचा- अभिच्या लग्नातून अनिरुद्ध आशुतोषला हकलवणार,अरुंधती घेणार मित्राची बाजू व्हिडीओनंतर आश्चर्य या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर परिसरात एकच चर्चा रंगली आहे. एवढा मोठा धमाका नेमका कशाचा होता, ही नैसर्गिक प्रक्रिया होती की कुणी घडवून आणली होती याबाबत सध्या संशोधन सुरू आहे. मात्र सीसीटीव्हीत या घटनेचा व्हिडीओ कैद झाल्यामुळे नागरिकांपासून शास्त्रज्ञान पर्यंत सर्वांनीच ह्याला गांभीर्याने घेतलं आहे.