मुंबई, 08 मार्च : मोबाईल ही अशी वस्तू आहे, जी सतत आपल्यासोबत असते. थोडा जरी वेळ मोबाईल आपल्यापासून दूर असेल तर आपल्याला जमत नाही. पण काही वेळा असं होतं की काही कारणामुळे आपण मोबाईल एका ठिकाणी ठेवतो आणि तो कुठे ठेवला आहे तो विसरतो. किंवा काही वेळा तो हरवतो अशा वेळी तो मोबाईल शोधण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. सध्या अशीच मोबाईल शोधण्याची स्पर्धा लागली आहे ती सोशल मीडियावर (Find hidden phone in photo). सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. यापैकी काही फोटो मजेशीर आणि इंटरेस्टिंग असतात (Amazing puzzles). असाच हा फोटो आहे. हा फोटो म्हणजे एकप्रकारे पझल किंवा गेमच आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. कारण या फोटोमध्ये दडला आहे तो एक मोबाईल. पण हा मोबाईल सहसासहजी दिसत नाही आहे. बरेच लोक शोधून शोधून थकले. फोटो तसा जुना आहे पण यातला मोबाइल फोन शोधण्याची क्रेझ पुन्हा सुरू झाली आहे. हा फोटो फिलिपीन्सच्या जे ये मी ने आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता. सेलफोन शोधा असं याच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलं आहे. हे वाचा - …अन् Energy drink ठरलं विष; पिताच 25 वर्षांच्या तरुणाचा झाला मृत्यू हा फोटो उंचावरून काढण्यात आला आहे. ज्यात एक टेबल आणि जमिनीवर सुंदर असं कार्पेट दिसतं आहे. याशिवाय यामध्ये मोबाईल आहे. तुम्ही फोटो नीट पाहाल तर टेबलवर तर कुठेच मोबाईल दिसतन नाही. याचा अर्थ कार्पेटवरच कुठेतरी मोबाईल आहे. यावरील मोबाईल पटकन दिसत नाही, याचं कारण म्हणजे मोबाईल फोन उलटा पडला आणि मोबाईल कव्हरची डिझाइन अगदी या कार्पेटसारखीच आहे. पण तरी तुमचे डोळे शार्प असतील तर तुम्हाला हा मोबाईल नक्कीच दिसेल. फोटोवरून नीट नजर फिरवा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा मोबाईल कुठे आहे. हे वाचा - कमी वयातच अंधुक दिसू लागलंय? जाणून घ्या दृष्टी कमी होण्याचे कारणे आणि उपाय तुम्हाला मोबाईल दिसला तर उत्तम पण नाही दिसला तर आता खालील फोटो पाहा. यात तुम्हाला मोबाईल नेमका कुठे आहे ते समजेल. टेबलच्या उजव्या बाजूला पायाजवळ तुम्हाला मोबाईलचा कॅमेरा दिसेल आणि नीट पाहिलं तर त्याचं डिझाइनही तुम्हाला कार्पेटपेक्षा थोडा वेगळं दिसेल.
आता ही बातमी तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना या फोटोतील मोबाईल शोधण्याचं चॅलेंज नक्की द्या.